आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Krishna Janmabhoomi Case In Court ; Here's Latest News Updates From Uttar Pradesh Lucknow

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मथुरा:अयोध्येनंतर आता मथुरेतील कृष्ण जन्मभूमीचे प्रकरण गेले कोर्टात; 13.37 एकर जमिनीच्या मालकी हक्कासह मशीद हटवण्याची मागणी

मथुरा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भगवान श्रीकृष्ण विराजमान यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी याचिका दाखल केली आहे
  • याचिकेनुसार शाही ईदगाह मशिदी असलेल्या ठिकाणी पूर्वी तुरुंग होते आणि तिथेच भगवान कृष्णाचा जन्म झाला होता

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान रामाच्या मंदिराचे बांधकाम जोरात सुरू आहे. यादरम्यान आता, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण स्थानिक न्यायालयात पोहोचले आहे. याबाबत एका स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनुसार, 13.37 एकर जमिनीच्या मालकी हक्कासह शाही ईदगाह मशिदीला हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतू, श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टच्या सचिवाचे म्हणने आहे की, त्यांचा या केसशी कुठलाही संबंध नाही.

भगवान श्रीकृष्ण विराजमानकडून सुप्रीम कोर्टाचे वकील विष्णु शंकर जैनने याचिका दाखल केली आहे. त्यात जमिनीबाबत केलेल्या 1968 च्या कराराला चुकीचे म्हटले आहे. ही केस भगवान श्रीकृष्ण विराजमान, कटरा केशव देव खेवट, मौजा मथुरा बाजार शहराकडून वकील रंजना अग्निहोत्री आणि 6 इतर भाविकांकडून दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत दावा- ज्या ठिकाणी मशीद आहे, तेथे तुरुंग होते

याचिकेत ‘भगवान श्रीकृष्ण विराजमान’ आणि ‘स्थान श्रीकृष्ण जन्मभूमी’च्या नावाने दाखल करण्यात आली आहे. यानुसार, ज्या ठिकाणी आता शाही ईदगाह मशीद उभी आहे, त्या ठिकाणी पूर्वी तुरुंग होते. याच तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

वकील हरिशंकर जैन आणि विष्णु शंकर जैनने सांगितले की, याचिकेत अतिक्रमण हटवणे आणि मशिदीला हटवण्याची मागणी केली आहे. परंतू, या केसमध्ये 'Place of worship Act 1991' चा अडथळा आहे. या अॅक्टनुसार, स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 1947 ला धार्मिक स्थळ ज्या समाजाचे होते, त्याचेच राहिल. या कायद्यातून फक्त रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाला सूट देण्यात आली होती.

याचिकेशी श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासने संबंध नसल्याचे म्हटले

दुसरीकडे श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्था ट्रस्ट (श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास) चे सचिव कपिल शर्माने म्हटले की, ट्रस्टचा या याचिकेशी आणि यासंबंधी लोकांची कोणताही संबंध नाही. या लोकांनी त्यांच्या वतीने याचिका दाखल केली आहे, आमचा याच्याशी काहीच संबंध नाही.

काय आहे 1968 करार ?

1951 मध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट तया करुन ठरवण्यात आले होते की, ते भव्य मंदिर बांधतील. यानंतर 1958 मध्ये श्रीकृष्ण जन्म स्थान सेवा संघ नावाची संस्था स्थापित करण्यात आली. कायद्यानुसार सा संस्तेला जागेचा मालकी हक्क नव्हता, पण यांनी ट्रस्टसाठी सर्व गोष्टी करणे सुरू केले. या संस्थेने 1964 मध्ये संपूर्ण जमिनीवर मालकी हक्क मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली, पण 1968 मध्ये स्वतः मुस्लिम पक्षासोबत सामंज्यस्य करार करण्यात आला. यानुसार, मुस्लिम पक्षाने मंदिरासाठी आपल्या हिस्यातील काही जागा दिली आणि त्याबदल्यात जवळच दुसरी जागा घेतली.

बातम्या आणखी आहेत...