आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राममंदिरानंतर आता कृष्णमंदिर:मथुरेत कृष्ण जन्मभूमीचे प्रकरण कोर्टात; मशीद हटवण्याची मागणी

मथुराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीकृष्ण विराजमानने न्यायालयात दिवाणी खटला दाखल करून 13.37 एकर जमिनीचा मालकी हक्क मागितला

अयोध्येतील राम जन्मभूमी वादानंतर आता कृष्ण जन्मभूमीचेही प्रकरण कोर्टात गेले आहे. श्रीकृष्ण विराजमानने मथुरेच्या न्यायालयात दिवाणी खटला दाखल करून १३.३७ एकर जमिनीचा (कृष्ण जन्मभूमी) मालकी हक्क मागितला आहे. यासोबतच परिसरातील शाही मशीद आणि ईदगाह हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका ‘भगवान श्रीकृष्ण विराजमान’च्या नावाने दाखल करण्यात आली. यात त्यांच्या अंतरंग सखी म्हणून अधिवक्ता रंजना अग्निहोत्री आणि ६ भक्तांचा समावेश आहे. याचिकेनुसार, जेथे आज शाही मशीद व ईदगाह आहे, त्याच ठिकाणी श्रीकृष्णांचा जन्म झाला ते कारागृह आहे.