आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक संकट असूनही मिझाेरामने म्यानमार किंवा बांगलादेशहून येणाऱ्या कुकी-चिन स्थलांतरितांना आश्रय दिला आहे. बांगलादेशच्या चटगाव येथून पलायन केलेल्या ३१० कुकी-चिन आदिवासींच्या सुरक्षेसाठी त्यांना सर्व सुविधा असलेल्या चार गावांमध्ये आश्रय दिला. गेल्या महिन्यात बांगलादेशचे सैन्य व कुकी-चिन नॅशनल फ्रंट (केएनएफ) नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूमिगत संघटना कुकी-चिन नॅशनल आर्मी यांच्या संघर्ष सुरू झाला हाेता. केएनएने चटगाव हिल्स ट्रॅक्टस येथील रहिवासी कुकी-चिन नागरिकांच्या स्वायत्ततेची मागणी सातत्याने लावून धरली आहे. रंगमाटी व बंदरबन हे वादाचे क्षेत्र आहेत. स्थलांतरितांच्या म्हणण्यानुसार संघर्ष सुरू झाल्यानंतर म्यानमारच्या अराकान सैन्यासाेबत बांगलादेशच्या सैन्याने अनेक गावांत छाप्याची कारवाई केली आणि नागरिकांवर दडपशाही केली. अनेक आदिवासींवर हल्ले करण्यात आले. त्यांची धरपकड करण्यात आली. अनेकांची हत्याही झाल्या.
लांग्तलाईतील एक अधिकारी म्हणाले, आदिवासींना पर्व-३ गावातून तुथुम्नार, चामदुर पी, माैतलांग, वाथुम्मुई गावात हलवण्यात येत आहे. स्थलांतरित मिझाेराममध्ये २० नाेव्हेंबरला दाखल झाले हाेते. त्यामुळेच त्यांच्या आश्रयाची तयारी करण्यात आली. या आदिवासींची बांगलादेश, म्यानमारच्या सीमेवरील सामुदायिक भवन, शाळांत राहण्याची साेय करण्यात आली आहे.
आदिवासींवर बहिष्कार बांगलादेशमध्ये आम्हाला एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासही राेखण्यात आल्याचा अनुभव स्थलांतरितांनी सांगितला. स्थानिक मुस्लिमांनी सामाजिक बहिष्कार टाकला. काही धान्य विक्रीला नेल्यानंतर खरेदी करत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.