आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kulgam । Encounter । Four Terrorist Killed In Pombai And Gopalpora Villages In Jammu Kashmir

दहशतवादी ठार:भारतीय सुरक्षा दलाचे मोठे यश, जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये आज सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव अफाक सिकंदर असे असून तो द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेचा कमांडर असल्याची माहिती मिळत आहे. काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, कुलगाममधील पुंबई आणि गोपालपोरा गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार केले असून अजूनही चकमक सुरूच आहे.

यापूर्वी 15 नोव्हेंबरला श्रीनगरच्या हैदरपोरामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पोलिस अधिकार्‍यांच्या मते, या वर्षात आतापर्यंत 135 हून अधिक दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. 38 परदेशींसह 150-200 दहशतवादी अजूनही खोऱ्यात सक्रिय आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम राबवली जात आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून एक आयडीही जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्लांमध्ये वाढ होत आहे. 8 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एका सेल्समनची हत्या केली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 7 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एका कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या केली होती.

तर ऑक्टोबरमध्ये दहशतवाद्यांनी 13 नागरिकांची हत्या केली होती. यामध्ये व्यापारी, कामगार आणि शिक्षकांचा समावेश होता. ऑक्टोबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते. त्याचवेळी सुरक्षा दलांनी 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

बातम्या आणखी आहेत...