आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CM Rawat Of Uttarakhand Said Corona Will Not Spread By The Grace Of Mother Ganga In Kumbh, While The Central Government Had Already Warned For A Super Spreader

कोरोनात दुटप्पीपणा?:कुंभमध्ये गंगेच्या कृपेने कोरोनाचा फैलाव होणार नाही, दिल्लीतील मर्कज प्रकरणाशी तुलना करू नका; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे विधान

हरिद्वार9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर दोन्ही प्रकरणांची तुलना केली जात आहे. - Divya Marathi
सोशल मीडियावर दोन्ही प्रकरणांची तुलना केली जात आहे.
  • कुंभ मेळ्यात 18 हजार जणांची चाचणी 102 कोरोना पॉझिटिव्ह

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत पुन्हा आपल्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी कुंभ मेळ्यावर चिंता व्यक्त केली जात असताना गंगेच्या कृपेने कोरोनाचा फैलाव होणार नाही असे रावत म्हणाले. सोबतच, कुंभ मेळा आणि गेल्या वर्षी चर्चेत राहिलेल्या तबलीगी जमात या दोन प्रकरणांची तुलना करू नका. दिल्लीच्या निझामुद्दीन मर्कजमध्ये लोक एका खोलीत बंद होते त्यामुळे कोरोना पसरला. पण, कुंभ मेळा मोकळ्या वातावरणात होत असल्याने कोरोनाचा फैलाव होणार नाही असा अजब तर्क त्यांनी दिला आहे.

आपले म्हणणे पटवून देताना रावत इतक्यातच थांबले नाहीत. कोरोना काळातही कुंभ मेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक गोळा होत आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना रावत म्हणाले, "हरिद्वारमध्ये 16 पेक्षा अधिक घाट आहेत. यांची तुलना मरकजशी करू नका." चिंताजनक बाब म्हणजे, कुंभमध्ये बुधवारी शाही स्नान सुरू आहे. यात लाखोंच्या संख्येने भाविक स्नान करत आहेत. तत्पूर्वी सोमवारी झालेल्या शाही स्नानमध्ये कोरोना काळातील नियमांचे पालन करण्यात आलेले नाही.

शाही स्नानमध्ये लाखोंची गर्दी
कुंभ मेळ्यात शाही स्नानमध्ये सोमवारी 35 लाखांपेक्षा अधिक लोक सामिल झाले. त्यापैकी 18169 जणांची चाचणी करण्यात आली असून 102 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. ज्यांच्याकडे कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे त्यांनाच प्रवेश दिला जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पण, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. केंद्र सरकारने आधीच कुंभ मेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरू शकतो असा इशारा दिला आहे. सोबतच, राज्य सरकारला सतर्क राहण्याचे निर्देशही दिले. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत वेगळाच विचार करत आहेत.

सोशल मीडियावर दोन प्रकरणांची तुलना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर माध्यमांवर आरोप केले जात आहेत. गतवर्षी निझामुद्दीन मर्कजमध्ये तबलीगी जमात एकत्रित आली असताना खूप टीका करण्यात आली होती. त्यावेळी 2000 पेक्षा कमी तबलीगी जमातचे सदस्य एकत्रित होते. पण, कुंभ मेळ्यात लाखोंच्या संख्येने गर्दी होत आहे. यामध्ये कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली होत आहे. तरीही त्याची पाहिजे तशी चर्चा होत नाही अशी टीका केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...