आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिद्वार कुंभ 2021:पहिल्या शाही स्नानाच्या तयारीला वेग; प्रथमच मुस्लिम महामंडलेश्वर

हरिद्वारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संन्यासी आखाड्याच्या पेशवाईच्या सोबतच हरिद्वार कुंभ २०२१ चा शंखनाद झाला आहे. आतापर्यंत संन्यासी आखाड्यांपैकी पाच संन्यासी आखाडे- जुना आवाहन, अग्नी, निरंजनी व आनंद आखाड्याची पेशवाई झाली आहे. या आखाड्यांचे नागा संन्यासी व रमता पंचांनी छावणी प्रवेश करून देवतांची स्थापना केली आहे. सोमवारी महानिर्वाणी आखाडा तथा अटल आखाड्याच्या पेशवाई प्रवेशासोबत ११ मार्चला शिवरात्री पर्वानिमित्त होणाऱ्या पहिल्या शाही स्नानासह कुंभाला विधिवत सुरुवात होईल. पहिल्या शाही स्नानात फक्त सात संन्यासी आखाडे स्नान करतात. यात सर्वात आधी जुना आखाड्यासह आवाहन आखाडा व अग्नी आखाडा स्नान करेल. नंतर निरंजनी व आनंद आखाडा व तिसऱ्या क्रमांकावर महानिर्वाणी व अटल आखाडा स्नान करेल.

दिल्लीच्या रहिवासी आहेत बेगम :
महाकुंभात प्रथमच सनातन परंपरेच्या कुंभात एखादा मुस्लिम महामंडलेश्वराच्या पदावर विराजमान असेल. दिल्लीतील किन्नर छोटी बेगमला हरिद्वार कुंभाआधी किन्नर आखाड्यात ११ महामंडलेश्वरांसोबत महामंडलेश्वर पदावर विराजमान केले जाईल. या वेळी कुंभात किन्नर आखाड्याने प्रथमच पेशवाईत भाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...