आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा:35 लाख लोकांचे गंगास्नान; 18,169 जणांची चाचणी, 102 काेराेना पॉझिटिव्ह

हरिद्वार9 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मरकज व कुंभची तुलना होऊ शकत नाही : रावत

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत म्हणाले की, कुंभमेळ्यात गंगामातेच्या कृपेने कोरोना फैलावणार नाही. कुंभ आणि मरकजची तुलना चुकीची आहे. मरकजमुळे कोरोना बंद खोलीतून पसरला. कारण तेथील सर्व लोक एका बंद खोलीत होते. हरिद्वारमधील कुंभक्षेत्र नीलकंठ व देवप्रयागपर्यंत मोकळ्या वातावरणात आहेत.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखोंची गर्दी व कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे वादंग निर्माण झाले होते. सोमवारी शाही स्नानात ३५ लाखांवर लोक सहभागी झाले. त्यापैकी १८,१६९ लाेकांची चाचणी करण्यात आली. त्यात १०२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

५ जणांसाठीच उघडणार मरकज
नवी दिल्ली | सर्वसामान्य लोकांसाठी मरकज उघडण्याचा आदेश देण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला आहे. कोर्ट म्हणाले, तूर्त ५ जण दिवसातून पाच वेळा नमाज अदा करू शकतील. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निजामुद्दीन मरकज सर्वसामान्यांसाठी उघडला जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...