आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Laciers Cracking Due To Heat, 100 Crore People In Danger; Indus, Ganga, Brahmaputra River Basin Area

ग्लोबल वॉर्मिंग:उष्णतेने वितळताहेत हिमनग; 100 कोटी लोक संकटात, इंदूर, रुरकी, दिल्ली, अहमदाबाद व नेपाळच्या संशोधकांचे संशाेधन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिमालय-काराकोरम डोंगरात ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रभावामुळे सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी खाेरे भागात राहणाऱ्या जवळपास एक अब्ज लोकसंख्येचे आयुष्य आणि उपजीविका संकटात आहे. हिमनग वितळल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. हवामान बदल शेती, उपजीविकेचे इतर साधने आणि जलविद्युत क्षेत्राला प्रभावित करेल. ही बाब भारत आणि नेपाळच्या संशोधकांच्या संशोधनात समोर आली आहे.

इंदूर, रुरकी, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद आणि नेपाळच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. संशोधनानुसार, हिमालय-काराकोरम भागात नद्यांची पाणीपातळी बर्फ किंवा हिमनग वितळणे, पाऊस आणि भूजलाने प्रभावित होत असते. हिमालय-काराकोरम भागातील अर्धा बर्फ हिमनगात जमा आहे. वेगवेगळ्या हवामानात हिमनग वितळण्याचे प्रमाण नदीत पाण्याच्या प्रवाहावर परिणाम करतो. एप्रिल ते जूनदरम्यान उन्हाळ्यात हिमालय-काराकोरम डोंगरात बर्फ वितळल्याने प्रवाह असतो. नंतर हिमनग ऑक्टोबरपर्यंत वितळतात. हिवाळ्यात बर्फ गोठतो. मात्र जागतिक तापमान हिमालय- काराकोरम भागात हिमनग, हिमवर्षाव आणि पावसाला प्रभावित करत आहे. त्याचा परिणाम नदीखोऱ्याच्या खालच्या भागातही होईल. संशोधनात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, २०५० पर्यंत विविध हंगामात हिमनग वितळल्याने नदीत जलप्रवाह वाढेल. संशोधनानुसार त्याचा परिणाम हिमालय-काराकोरम नदीखोऱ्याच्या २०.७५ लाख चौरस किमी भागावर होईल. यात ५.७७ लाख चौरस किमी भाग सिंचनाचा आहे. हिमालय-हिंदुकुश भागात ५० हजारांपेक्षा जास्त हिमनग आहेत आणि त्यातील फक्त ३० चेच बारकाईने अवलोकन केले जात आहे.

आता एप्रिलमध्येच वितळताहेत हिमनग
इंदूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संशोधनाचे प्रमुख लेखक आणि सहायक प्राध्यापक फारूक आझम यांनी सांगितले, संशाेधनात आढळले की, नदीचा प्रवाह बदलल्याने सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता आणि प्रमाणावर परिणाम होईल. हिमनग आधी जूनमध्ये वितळायचे, आता एप्रिलमध्येच वितळतात. हा बदल उपजीविका आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करेल.

या भागात राहतात लोकसंख्येच्या १३% लोक; भारत, पाक, बांगलादेश जास्त प्रभावित होतील संशोधनानुसार, हिमालय आणि काराकोरम डाेंगरांवर तापमान वाढल्याने बदलाचा परिणाम भारतावर सर्वाधिक होईल. तसेच दिल्ली, लाहोर, कराची, कोलकाता आणि ढाका शहरांवर विशेष परिणाम होईल. येथे प्रभावित लोकांची संख्या २०२१ मध्ये जागतिक लोकसंख्येच्या जवळपास १३% किंवा ८ पैकी एक व्यक्ती राहते. भारतात केंद्रशासित जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर हरियाणा, राजस्थानचा काही भाग िसंधू नदी बेसिनमध्ये येतो. उत्तराखंड, दिल्ली, दक्षिण हरियाणा, यूपी, बिहार, झारखंड, प. बंगाल, राजस्थान व मप्रचा मोठा भाग गंगा बेसिनमध्ये आहे. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि बहुतांश आसाम, मेघालय, नागालँड ब्रह्मपुत्रा बेसिनमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...