आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅक फंगस:काशीमध्ये ब्लॅक फंगस इंजेक्शनची कमतरता, रोज 500 डाेसची गरज

वाराणसी / चंदन पांडेय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान माेदींच्या मतदारसंघात इंजेक्शनचा तुटवडा

पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या बनारस मतदारसंघात काेराेनाच्या हाहाकारानंतर आता ब्लॅक फंगसनेही पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. या शिवाय इंजेक्शनच्या तुटवड्यामुळेही रुग्ण आणि कुटुंबीयांची डाेकेदुखी वाढवली आहे. बीएचयू येथील सर सुंदरलाल चिकित्सालयाच्या पाेस्ट काेविड वाॅर्डात आतापर्यंत १०१ रुग्ण दाखल झाले आहेत. इंजेक्शनसाठी त्यांच्या कुटुंबीयांना पटणा आणि दिल्लीपर्यंत धाव घ्यावी लागत आहे. इंजेक्शनचा तुटवडा ब्लॅक फंगसच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरत आहे आतापर्यंत यामुळे १५ रुग्ण दगावले आहेत. त्याच वेळी, डॉक्टर पर्यायी इंजेक्शन आणि औषधांवर अवलंबून राहत अशा रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहेत. यूपी सरकारने रेडक्राॅस साेसायटीवर ब्लॅक फंगसच्या रुग्णांना अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचा पुरवठा करण्याची जबाबदारी साेपवली आहे परंतु अद्याप एकही मिळालेले नाही.

वाराणसी रेडक्राॅस साेसायटीचे सचिव डाॅ. संजय राय म्हणाले, एक आठवड्यापूर्वी शासनाने जबाबदारी निश्चित करून इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले हाेते. त्यानंतर काळाबाजार हाेऊ नये म्हणून रेडक्राॅसकडून रुग्णांना इंजेक्शन देण्यात येतील. एका रुग्णाला राेज ३ - ५ इंजेक्शनची गरज आहे. अंदाजे साडेसहा हजार रुपयांचे एक इंजेक्शन आहे. त्यासाठी कमिटी स्थापन केली असून त्यात आयुक्त, आराेग्य सहसंचालक, बीएचयूचे डाॅक्टर आणि रेडक्राॅस साेसायटीचे सचिव या सदस्यांचा समावेश आहे.

शस्त्रक्रियेची पूर्ण तयारी, पण इंजेक्शन नाही
बीएचयूच्या सर सुंदरलाल रुग्णालयाच्या कोविड पोस्टमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य शंकर चौधरी यांनी सांगितले की, त्याचा भाऊ कैलाशची पत्नी राधा ब्लॅक फंगसने पीडित आहे. २५ मे राेजी तिला दाखल केलेे होते. गुरुवारी संध्याकाळी शस्त्रक्रियेसाठीही नेले पण त्यांना अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन मिळालेले नाही,प्रकृती गंभीर आहे. इंजेक्शन नसल्याने त्याला पर्याय देण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एप्रिलच्या अखेरीस राधाला ताप येऊन टायफाइड झाला हाेता.

बातम्या आणखी आहेत...