आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीत सुरू असलेल्या आंदाेलनात देशातील ७ माेठ्या राज्यांतील शेतकरीदेखील सहभागी हाेऊ इच्छितात. परंतु त्यांना तेथे जाता येत नाही. पंजाब-हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेश साेडल्यास उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांच्या कमी सहभागाबद्दल “भास्कर’ने प्रत्यक्ष पडताळणी केली. त्यात वाहतूक व्यवस्था व संसाधनांतील तुटवडा हीच माेठी आडकाठी ठरल्याचे दिसून आले. काेराेनामुळे रेल्वे व वाहने कमी वापरात आहेत. शेतातील उभ्या पिकांचे संरक्षणही याच शेतकऱ्यांना करायचे आहे. त्याशिवाय शेतकरी संघटनांत प्रभावी नेतृत्वाचादेखील अभाव आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, छत्तीसगड, झारखंडच्या शेतकऱ्यांची ही समस्या आहे.
गुजरातमध्ये तर राज्य सरकारवर शेतकऱ्यांची नजरबंदी केल्याचा आराेप आहे. राज्याच्या छाेट्या-माेठ्या १५ शेतकरी संघटनांनी एक संघर्ष समिती स्थापन केली आहे. संघटनेचे सरचिटणीस विपिन पटेल म्हणाले, काही दिवसांत १० हजार शेतकरी दिल्लीला कूच करण्याच्या तयारीत आहेत. राजस्थान किसान महापंचायतीचे अध्यक्ष खासगी मंडईमुळे भाव वाढून मिळेल : गाैतमकुमार बिहारचे प्रगतिशील शेतकरी नेते गाैतमकुमार म्हणाले, खासगी मंडई सुरू झाल्यास निकाेप स्पर्धा वाढेल आणि भावदेखील वाढून मिळेल. हमीभावात माल खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड ठाेठवावा. सरकारने खात्री द्यावी. पंजाबमध्ये हमीभाव १८०० मिळताे. गुजरातेतील सुरत जिल्हा शेतकरी संघटना प्रमुख परिमल पटेल म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्या याेग्य आहेत. दक्षिण गुजरातमध्ये खरेदी सहकारी संस्थांच्या माध्यमातून हाेते. त्यांनी ठरवलेल्या भावाचा शेतकऱ्यांवर काही परिमाण जाणवत नाही. किसान मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अखंडप्रतापसिंह म्हणाले, खरा मुद्दा येथे नेतृत्वाचा अभाव हाच आहे. पायाभूत सुविधाही नाहीत. त्यामुळेच ते दिल्लीपर्यंत पाेहाेचू शकत नाहीत.
यूपी : शेतकरी संघटनांची चर्चा सुरू असेपर्यंत आंदाेलनास पाठिंबा देणार उत्तर प्रदेशात भारतीय किसान युनियनसह पश्चिम भागातील अनेक शेतकरी संघटना सिंघू सीमा व राष्ट्रीय महामार्गावर सक्रिय झाल्या आहेत. किसान मंचचे प्रमुख अखंडप्रतापसिंह म्हणाले, संघटना जातींमध्ये विभागलेली आहे. पश्चिम विभाग साेडल्यास राज्यातील शेतकऱ्यांना प्रभावी नेतृत्व नाही.
झारखंड : ९० टक्के लहान शेतकऱ्यांकडे साठवणूक क्षमता नसल्याने नाही सहभाग
झारखंडमध्ये सुमारे ९० लहान शेतकरी आहेत. शेतकरी नेते महादेव महताे म्हणाले, येथील शेतकरी शेतमाल शेतातून थेट विक्रीसाठी नेतात. त्यांच्याकडे साठवणुकीची व्यवस्था नाही. वर्षभराचे रेशन जमवू शकतील व काही पैसे बाळगू शकतील. एवढेच पीक जिल्ह्यातील शेतकरी पिकवतात. अशीच परिस्थिती कमी-जास्त प्रमाणात संपूर्ण राज्यात आहे. आंदाेलनात धनबादचे शेतकरी सहभागी नाहीत.
बिहार : जात व पक्षाच्या दृष्टीनेही शेतकऱ्यांत समर्थन-विराेधाचे सूर बिहारमध्ये मंडई पद्धती आहे. प्रगतिशील शेतकरी नेता गाैतमकुमार म्हणाले, येथील शेतकरी गाेविंदभाेग इत्यादी उत्कृष्ट तांदळाला १००० ते १२०० रुपये भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. किसान सभेचे सरचिटणीस राजारामसिंह म्हणाले, जात व पक्षाच्या पातळीवर समर्थन व विराेधाचे सूर दिसतात.
राजस्थान : शहाजहानपूर सीमेवर ठिय्या, पीक वाचवण्याची चिंता
राजस्थानचे शेतकरी शहाजहानपूर सीमेवर २ डिसेंबरपासून आंदाेलनात सक्रिय आहेत. सुमारे ५० संघटना आंदाेलनात सहभागी आहेत. येथे ४ किमीपर्यंत टेंट लावलेले आहेत. आंदाेलनात संख्या कमी असण्यामागे थंडीची लाट व पीक वाचवण्याची धडपड हे कारण आहे.
महाराष्ट्र : शेतकरी चिंतित, गरज पडल्यास माेठ्या संख्येने जाण्यास तयारकिसान सभेचे नेते अजित नवले म्हणाले, पंजाब-हरियाणात गहू व इतर पिके हमीभावात जास्त प्रमाणात विकली जातात. नवीन कृषी कायद्यामुळे हे बंद हाेईल, अशी भीती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही वाटते. संयुक्त किसान माेर्चाने व्यापक आंदाेलन केल्यास येथील शेतकरी दिल्लीत माेठ्या संख्येने जाण्यास तयार आहेत.
गुजरात : शेतकऱ्यांच्या घरी पहारा, तरीही ३ हजार शेतकरी उद्या हाेणार रवाना
राजकाेटचे शेतकरी नेते चेतन गढिया म्हणाले, राज्य सरकार आंदाेलनाचे समर्थन करणाऱ्यांना नजरबंदीत ठेवत आहे. त्यांच्या घरावर चाेवीस तास निगराणी ठेवली जाते. सुरेंद्रनगर किसान माेर्चाचे प्रमुख रामकुभाई करपडा म्हणाले, नव्या कायद्याबाबत जागृती आणू. साैराष्ट्राचे ३ हजार शेतकरी ३ जानेवारीला दिल्लीस जातील.
छत्तीसगड : शेतकरी पीक विक्रीत व्यग्र, महिला सहकार्य करताहेतशेतकरी पीक विक्रीत व्यग्र आहेत. त्यानंतर ५०० हून जास्त शेतकरी दिल्लीतून परतले आहेत. शेतकरी नेते डाॅ. संकेत ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार आैषधी व आवश्यक सामान घेऊन बुधवारी काही महिला रवाना झाल्या. एक हजार शेतकरी दिल्लीत पाेहाेचले.या आठवड्यात त्या रवाना होतील.
चीन सुरक्षेसाठी धोकादायक, आॅस्ट्रेलियाचे मत
क्षेत्रफळाच्या दृष्टीने आॅस्ट्रेलिया भारतापेक्षा माेठा देश आहे. परंतु तेथील लाेकसंख्या खूप कमी आहे. आॅस्ट्रेलियाला विस्तारवादी धाेरणांमुळे चीनपासून माेठा धाेका वाटताे. २०१७ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या गुप्तचर यंत्रणेने चीनला इशारा दिला हाेता. चीन आॅस्ट्रेलियाच्या अंतर्गत प्रकरणांत हस्तक्षेप करत असल्याबद्दल आॅस्ट्रेलियाने चीनवर नाराजी व्यक्त केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.