आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गलवान घाटीत झालेल्या हिंसक मारामारीला भारताने थेट चीनला जबाबदार ठरवले आहे. याप्रकरणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात फोनवर चर्चा झाली. यानंतर जयशंकर म्हणाले की, चीनमध्ये झालेल्या घटनेसाठी चीन जबाबदार आहे आणि त्यांनी सर्वकाही विचारपूर्वक ठरवून केले आहे.
यादरम्यान दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मेजर जनरल स्तरावर बातचीत झाली. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या बातचीतमधून कोणताच पर्याय निघाला नाही. गलवानमधील परिस्थिती जशी होती, तशीच आहे. येणाऱ्या काळात अजून बातचीत केल्या जातील.
न्यूज एजेंसी रॉयटर्सने सांगितले की, दोन्ही देशांना लवकरात लवकर हा वाद मिटवायचा आहे. दोन्ही देश कायद्यातून या वादाचा तोडगा काढण्याच्या बाजुने आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला अपील केली आहे की, या वादासाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जावी आणि नियंत्रण रेषेजवळ तैनात जवानांना नियंत्रणा ठेवले जावे. दरम्यान, एस जयशंकर म्हणाले की, या घटनेमुळे द्विपक्षीय संबंधांवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे. चीनने विचार करुन पुढील पाउले उचलावी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.