आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारचा अचानक झालेला लडाख दौरा सोशल मीडियावर चर्चेत आहे. पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लाखमध्ये होते. या दरम्यान, त्यांनी नीमू फॉरवर्ड बेसवर लष्कर, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधला. यानंतर गलवान हिंसाचारात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सोशल मीडियावर यावरूनच सध्या चर्चा सुरू आहे. 69 वर्षीय मोदींची तुलना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दौऱ्याशी केली जात आहे. 2005 मध्ये मनमोहन सिंग लडाखला पोहोचले होते. त्यावेळी ते सियाचीनला पोहोचणारे पहिले पंतप्रधान होते. तेव्हा त्यांचे वय 73 वर्षे होते आणि एकदा बायपास सर्जरी सुद्धा झाली होती.
लष्कराच्या हेलिकॉप्टरवरून चर्चा
मोदींनी आपल्या दौऱ्यात लेहमध्ये भरती असलेल्या जखमी जवानांची सुद्धा भेट घेतली. त्यावरून सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. काहींनी तर ते खरंच रुग्णालयात गेले होते का असा सवाल केला. सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यानुसार, मोदी ज्या रुग्णालयात गेले होते ते प्रत्यक्षात रुग्णालय नसून कॉन्फ्रंस रूम होते आणि मोदींच्या दौऱ्यासाठी खास सैनिकांना या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले होते असा दावा करण्यात आला.
मोदी विरुद्ध मनमोहनवर का होत आहे चर्चा?
ट्विटरवर गीत व्ही नावाच्या हँडलवर शुक्रवारी रात्री एक ट्विट करण्यात आले होते. त्यानुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लडाखला पोहोचले आणि सैनिकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांचे वय मोदींपेक्षा अधिक होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कॅमेरा टीम नव्हती. त्यांच्या दौऱ्याचा टीव्हीवर टेलिकास्ट करण्यासाठी टीम नव्हती. मनमोहन यांनी चीन दौरा केला त्यावेळी चिनी सैनिक मागे सरकले होते.
This was a PM who went to Ladakh to meet our troops.
— Geet V (@geetv79) July 3, 2020
He was older than Modi is today, and he never needed to wear a military outfit, parka, imported sunglasses or take a camera crew with him to telecast his visit on TV.
He made the Chinese withdraw when they intruded in Ladakh pic.twitter.com/3trwbK1r7X
गीत व्हीने शनिवारी केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले, 2005 मध्ये डॉ. मनमोहन सिंग 12000 फुट ऊंचीवर सियाचीनमध्ये जाणारे पहिले पंतप्रधान बनले. त्यावेळी त्यांचे वय 73 वर्षे होते आणि बायपास सर्जरी झाली होती. त्यावेळी मीडिया सर्कस होत नव्हती.
हॉस्पिटलवर प्रश्न उपस्थित करण्याचे कारण
हॉस्पिटलवर प्रश्न उपस्थित करण्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, तेथील परिस्थिती. ज्या हॉलमध्ये जखमी सैनिक भरती आहेत त्या ठिकाणी कुठल्याही वैद्यकीय सुविधा नाहीत. दुसरे कारण म्हणजे, एक फोटो ज्यात लष्कराचे जवान एकत्रित आहेत आणि नाश्ता करताना दिसून येत आहेत. यावरून सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. लोक दावा करत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रुग्णालयात गेले त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वैद्यकीय उपकरणे नाहीत. ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर असे काहीच दिसून आले नाही. आणखी एकाने लिहिले, हा मोदींचा मास्टरस्ट्रोक चीनसाठी नाही तर भारतासाठी आहे. या माणसाने आणखी एकदा देशाचे पंतप्रधान व्हायला हवे.
कॅमेरा नव्हता तर फोटो कुठून आले?
ट्विटवर कमेंट करताना एका यूझरने माजी पीएम सिंग यांच्यावर लिहिले, मॅम! फोटो सॅटेलाइटने काढला आहे का, कॅमेरा नसताना? दुसऱ्याने लिहिले, अच्छा तर हे पंतप्रधान आहेत. तर मग, यांनी काढलेले विधेयक राहुल गांधींनी फाडून फेकले होते. ते कोण होते, सुपर पंतप्रधान?
मनमोहन सिंग यांची सर्जरी 2005 नाही 1990 मध्ये झाली
एकाने गीत व्हीला टॅग करताना लिहिले, कृपया खोटे बोलणे बंद करा. मनमोहन सिंग यांची बायपास सर्जरी 1990 मध्ये झाली होती 2004 त्यांना स्टेंट लावण्यात आले होते. आपल्या सूत्रांना चेक करा ते (माजी पीएम सिंग) सियाचीनला 2005 मध्ये गेले होते. एका युझरने गीतवर टीका करताना माध्यमांना सर्कस म्हटले आहे.
आम आदमी पार्टीच्या नॅशनल सोशल मीडिया टीमकडून आरतीने ट्विट करताना लिहिले, हा देशासोबत झालेला दगा आहे. फोटो काढण्यासाठी काँफ्रन्स रूमला रुग्णालयात रुपांतरित करण्यात आले. तर दुसऱ्या एका यूझरने लिहिले, हॉस्पिटलमध्ये शूटिंगसाठी सेट-अप तयार करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये जखमी सैनिकांचे बेड अशा पद्धतीने बदलत नाही. हॉस्पिटलशी संबंधित वेग-वेगळ्या ट्विटमध्ये हॅशटॅगसह 'मुन्नाभाई एमबीबीएस' ट्विट करण्यात आले.
भारतीय लष्कराचे स्पष्टीकरण
लष्कराने हा दावा फेटाळून लावला आहे. लष्कराने सांगितल्याप्रमाणे, सैनिकांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आले ते रुग्णालयाचे ऑडियो व्हिजुअल हॉल आहे. पण, कोरोनाच्या कारणास्तव त्या हॉलला क्रायसिस एक्सपॅन्शन फॅसिलिटी अंतर्गत आयसोलेशन सेंटर बनवण्यात आले होते. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात जखमी सैनिकांना थेट याच ठिकाणी आणण्यात आले होते. तेव्हापासून हे सैनिक याच ठिकाणी भरती आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.