आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ladakhis Carried Ammunition On Their Shoulders To The Kargil Peaks, Then Armed With The Help Of The Army.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धाडस:लडाखींनी दारुगोळा खांद्यावर घेऊन कारगिल शिखरांवर पोहोचवला होता, नंतर लष्कराच्या मदतीसही होते सज्ज

लेह ( अमितकुमार निरंजन )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लडाख बुद्धिस्ट असो.ने आपल्या जवानांना सज्ज राहण्यास सांगितले

गलवान खोऱ्यात भारत-चीन वादादरम्यान लडाखचे लोक पुन्हा आपली धाडसी वृत्ती दाखवण्यास सज्ज आहेत. कारगिल युद्धात लडाखी लोकांनी शस्त्र-दारुगोळा दुर्गम डोंगरांत पोहोचवण्यास लष्कराला मदत केली होती.

लडाख बुद्धिस्ट असोसिएशनने पुढाकार घेऊन सरकार आणि स्थानिक प्रशासनला सांगितले की, आम्ही काेणत्याही प्रकारच्या मदतीस तयार आहोत. असोसिएशनचे अध्यक्ष पी. टी. कुनजेंग यांनी सांगितले की, १९९९ च्या कारगिल युद्धात अडीच हजार लडाखी लोकांनी पर्वताच्या दुर्गम भागांत दारुगोळा पोहोचवण्याच्या कामी लष्कराला मदत केली होती. गोळीबार सुरू असताना हे काम सुरू होते तेव्हा केवळ एक स्वयंसेवक जखमी झाला होता. महिला सत्तूच्या रोटी करून लष्कराला पाठवत होत्या. सध्याच्या स्थितीत कदाचित सरकारला आमच्या मदतीची गरज राहणार नाही, परंतु आम्ही एका आठवड्यात असे स्वयंसेवक तयार करू शकतो. कारगिल युद्धात असे काम केलेले लेह येथील ५२ वर्षीय सेवांग यांग जोर म्हणाले, “तेव्हा मी ३१ वर्षांचा होताे. आम्ही लडाखी लोक कमी ऑक्सिजन असतानाही चालणे, पळणे किंवा जड साहित्य वाहून नेण्यास सक्षम असतो. आम्ही अशा दुर्गम भागांत साहित्य वाहून नेण्याचे काम केले होते. खेचर जिथवर जाऊ शकत होते तिथवर ते वाहून नेले जात होते. त्यानंतर आम्ही ते साहित्य खांद्यावर घेऊन नेत असू.

बातम्या आणखी आहेत...