आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lady Hostel Video Shooting News In Kanpur City, He Used To Put A Mobile In The Broken Part Of The Bathroom, Police Caught,

अंघोळ करताना विद्यार्थिनीचा व्हिडिओ शूट:कानपूरच्या वसतीगृहातील घटना; स्वच्छता कर्मचारीच दरवाज्याच्या फटीत ठेवायचा मोबाईल

कानपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
काकडे देव पोलिस ठाण्याबाहेर वसतीगृहातील मुलींनी गोंधळ घातला. एका मुलीचा व्हिडिओ बनवताना संशयित कर्मचारी पकडला गेला. सदर आरोपीने आणखी व्हिडिओ बनवले असतील, असा आरोप मुलींनी केला. - Divya Marathi
काकडे देव पोलिस ठाण्याबाहेर वसतीगृहातील मुलींनी गोंधळ घातला. एका मुलीचा व्हिडिओ बनवताना संशयित कर्मचारी पकडला गेला. सदर आरोपीने आणखी व्हिडिओ बनवले असतील, असा आरोप मुलींनी केला.

उत्तरप्रदेशातील कानपूर शहराच्या रावतपूर येथील तुलसीनगर भागातील गर्ल्स वसतीगृहात एका विद्यार्थिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर वसतीगृहातील अन्य मुलींनी पोलिस ठाणे गाठून गोंधळ घातला. त्यांनी सांगितले की, व्हिडिओ शुट करणारा संशयित व्यक्ती रोज वसतीगृहात येण्याची शक्यता असून त्याने आणखी व्हिडिओही बनवले असावेत. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

गुरुवारी सकाळी एक विद्यार्थिनी बाथरूममध्ये अंघोळ करत होती. यादरम्यान वसतिगृहातील सफाई कर्मचारी ऋषी याने बाथरुमच्या दरवाजाच्या तुटलेल्या फटीतून मोबाईल टाकून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. तेव्हा मुलीची नजर त्या मोबाईलवर पडली. ती जोरात किंचाळली. त्याचा आवाज ऐकून इतर मुली घटनास्थळी पोहोचल्या आणि ऋषीला पकडले.

कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून व्हिडिओ बनवल्याची माहिती मिळताच अनेक विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडून घरी निघाल्या होत्या.
कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून व्हिडिओ बनवल्याची माहिती मिळताच अनेक विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडून घरी निघाल्या होत्या.

त्यानंतर संतप्त झालेल्या मुलींनी काकडेदेव पोलीस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात मुलींनी गोंधळ घातला. आरोपीस अटक करून कारवाई केली जावी. चौकशी करून आणखी व्हिडिओ असल्यास त्या दृष्टीने कारवाई व्हावी, अशी मागणी मुलींनी केली. विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून सदर संशयितास अटक करण्यात आली आहे.

पोलिस ठाण्याबाहेर मुलींनी गोंधळ घातला. एका मुलीचा व्हिडिओ बनवला असता तर आरोपीने इतर विद्यार्थिनींचाही व्हिडिओ बनवला असावा, असा प्रश्न उपस्थित केला.
पोलिस ठाण्याबाहेर मुलींनी गोंधळ घातला. एका मुलीचा व्हिडिओ बनवला असता तर आरोपीने इतर विद्यार्थिनींचाही व्हिडिओ बनवला असावा, असा प्रश्न उपस्थित केला.

दरवाज्याचा एक भाग तुटलेला

वसतिगृहाचा दरवाजा खालून तुटलेला होता, त्यात हा कामगार मोबाईल टाकून व्हिडिओ बनवत होता.
वसतिगृहाचा दरवाजा खालून तुटलेला होता, त्यात हा कामगार मोबाईल टाकून व्हिडिओ बनवत होता.

मुलींनी सांगितले की, संशयित आरोपी ऋषी वसतिगृहात काम करतो. त्यामुळे तो अनेकदा हॉस्टेलमध्ये ये-जा करत असतो. तेथे बाथरूमच्या दरवाजाचा खालचा भाग तुटलेला आहे. ऋषी त्याचा मोबाईलचा कॅमेरा त्याच भागावर ठेवायचा आणि व्हिडिओ बनवायचा.

वसतीगृहातील विद्यार्थीनिंशी संवाद साधताना पोलिस अधिकारी.
वसतीगृहातील विद्यार्थीनिंशी संवाद साधताना पोलिस अधिकारी.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मालकीचे हे वसतिगृह
तुळशीनगरातील हे वसतिगृह एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे आहे. वसतिगृहात सुमारे 60 विद्यार्थिनी राहतात. त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. आरोपी ऋषी हा सात वर्षांपासून या वसतिगृहात काम करतो. तो सर्वोदय नगर भागातील रहिवासी आहे.

बातम्या आणखी आहेत...