आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lakhimpur Case। Supreme Court Expresses Displeasure Over SIT In Lakhimpur Violence Case, Orders To Upgrade Inquiry Panel

योगी सरकारवर न्यायालयाची नाराजी:लखीमपुर हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने SIT वर व्यक्त केली नाराजी, चौकशी पॅनेलला अपग्रेड करण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपुर खीरी येथे घडलेल्या हिंसाचाराचा प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी करण्यात आली. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलगा आशीष मिश्रा हा मुख्य आरोपी असून त्याच्यासोबत आणखी दोन जणांचा जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली.

न्यायालयाने याप्रकरणी एसआयटीवर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तयार करण्यात आलेलया विशेष पॅनेलला अपग्रेड करण्यासाठी सांगितले आहे. या पॅनेलमध्ये मोठ्या प्रमाणात लखीमपुरातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अपग्रेड पॅनेलमध्ये न्यायालयाने योगी सरकारला IPS अधिकाऱ्यांची नावे मागितले आहे. त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT मध्ये सामील केले जाणार आहे. ऑक्टोंबरमध्ये लखीमपुर खीरीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळाला होता. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 4 शेतकरी होते.

3 ऑक्टोंबर रोजी झाला होता हिंसाचार

3 ऑक्टोंबरला शेतकरी आंदोलनातील काही शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवत, निदर्शने केली होती. त्याचदरम्यान एका गाडी चालकाने काही शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. त्या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर शेतकऱ्यांनी त्या गाडीतील ड्राइवरसह आणखी चार जणांना मारहाण केली, त्यात चौघांना मृत्यू झाला होता. त्या मारहाणीत एका पत्रकाराचा देखील मृत्यू झाला आहे. या हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा यासह अन्य 15 जणांविरोधात शेतकऱ्यांची हत्या करण्याचे आरोप लावण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...