आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lakhimpur Case: Supreme Court Takes Cognizance Of Itself, Hearing Today; Rahul And Priyanka Gandhi Met The Families Of The Victims In Lakhimpur

शेतकरी मृत्यू प्रकरण:लखीमपूर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्वत:हून घेतली दखल, आजच सुनावणी; तर राहुल व प्रियंका गांधी लखीमपुरात पीडित कुटुंबीयांना भेटले

नवी दिल्ली/लखनऊ/लखीमपूर खिरी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी लखीमपूर खिरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. - Divya Marathi
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी लखीमपूर खिरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
  • केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांनी दिल्लीतकामकाज सुरू केले, अमित शहांनाही भेटले

यूपीच्या लखीमपूर खिरीतील ३ ऑक्टोबरच्या हिंसाचाराची सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेतली आहे. त्यावर गुरुवारी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांचे पीठ सुनावणी करत आहे. या घटनेत ४ आंदोलक शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचे पुत्र आशिष मिश्रा हे प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, अाशिष यांच्या गोळीबारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला व त्यांच्याच वाहनाने शेतकऱ्यांना चिरडले. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा बुधवारी नवी दिल्लीत कार्यालयात गेले. त्यांनी गृहमंत्री अमित शहांचीही भेट घेतली. दुसरीकडे, बुधवारी रात्री उशिरा राहुल व प्रियंका गांधी लखीमपुरात पीडित कुटुंबीयांना भेटले. राहुल यांना आधी यूपी सरकारने लखीमपुरात जाण्याची परवानगी नाकारली होती.

पंजाब, छत्तीसगड सरकार देणार ५०-५० लाख रु.
पंजाब आणि छत्तीसगड सरकारने मृत शेतकऱ्यांच्या व पत्रकाराच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५०-५० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

कोणत्याही चौकशीस तयार : गृह राज्यमंत्री गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर मिश्रांनी आरोप पुन्हा फेटाळून लावले. ते म्हणाले, ‘मी आणि माझा मुलगा घटनास्थळी नव्हतो. कोणत्याही चौकशीस मी तयार आहे. जो दोषी असेल त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.’

चौथ्या शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार

  • गुरविंदर यांचे पुन्हा पोस्टमाॅर्टेम. नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • पंजाब, राजस्थान व उत्तराखंड काँग्रेस लखीमपूरपर्यंत मोर्चा काढणार.

राकेश टिकैत यांनी दिला ६ दिवसांचा अल्टिमेटम
एफआयआर नोंदवल्यानंतर अद्याप कोणालाही अटक न झाल्याने शेतकरी संघटना संतप्त आहेत. भाकियूचे प्रवक्ता राकेश टिकैत म्हणाले, भरपाई, नोकरी, मंत्रिपुत्रास अटक आणि मंत्र्यांची बडतर्फी अशा ४ मागण्या होत्या. भरपाई मिळाली. एफआयआर झाला, पण अटक झाली नाही. आम्ही ६ दिवसांचा वेळ देत आहोत. अटक झाली नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल. ४५ लाखांत समझोता झाला असे सरकारला वाटत असेल तर ती रक्कम परत केली जाईल.”

बातम्या आणखी आहेत...