आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lakhimpur Kheri Violence Police Arrested Priyanka Gandhi After She Was Detained For 30 Hours

लखीमपूर खिरी:प्रियंका गांधींना 30 तास ताब्यात ठेवल्यानंतर पोलिसांनी केली अटक, थोड्या वेळाने न्यायालयात हजर होणार

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर खिरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या प्रियंका गांधी यांना यूपी पोलिसांनी अटक केली आहे. सीतापूर येथील पीएसीच्या गेस्ट हाऊसमध्ये 30 तास ठेवल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात कलम 144 चे उल्लंघन आणि शांतता भंग होण्याची शक्यता यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्यांना काही वेळात न्यायालयात हजर करतील. पोलिसांनी प्रियांका यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, ज्यात काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा आणि यूपी काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, प्रियांकाच्या अटकेमुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्ते पीएसी गेस्ट हाऊसच्या बाहेर गोंधळ करत आहेत. त्यांनी गेस्ट हाऊसच्या बाहेरचे बॅरिकेड्स तोडले आणि घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्ते अन्नपदार्थ आणि तंबू घेऊन आले आणि पोलिसांनी त्यांना रोखले म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद झाला.

बातम्या आणखी आहेत...