आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lakhimpur Kheri Violence Update; Union Minister Of State For Home Ajay Mishra's Son Ashish Mishra Will Appear Before The Investigating Agency Today

लखीमपूर खेरी हिंसा प्रकरण:केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषला 12 तासांच्या चौकशीनंतर अटक, शेतकऱ्यांना जीपने चिरडल्याचा आरोप

लखनऊ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाच्या कठोर भूमिकेमुळे लखीमपूर प्रकरणातील आरोपी भाजप नेता आशिष मिश्रा यास घटनेच्या सातव्या दिवशी अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनींचा मुलगा असलेल्या आशिषची पोलिसांनी उशिरापर्यंत चौकशी केली. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. ३ ऑक्टोबरला घटनेच्या दिवशी दुपारी २.३६ ते ३.३० दरम्यान तो कुठे होता, या प्रश्नाचे उत्तर आशिष देऊ शकला नाही. याच वेळेत वाहनाने चिरडल्याने चार शेतकरी ठार झाले होते. त्यानंतर भाजपचे दोन कार्यकर्ते आणि पत्रकारासहित आणखी ४ जण मारले गेले होते. दरम्यान, आशिष याला आता न्यायालयात हजर केले जाईल. पोलिस न्यायालयात आशिष याला कोठडी देण्याची मागणी करतील.

आशिषला चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला दोन डझनहून अधिक प्रश्न विचारले. ३ ऑक्टोबरला दुपारी २.३६ ते ३.३० या काळात तो कुठे होता, हे आशिष सांगू शकला नाही. यादरम्यान एका गाडीखाली चेंगरून चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर उसळलेल्या हिंसाचारात भाजपच्या दोन कार्यकर्त्यांसह एक पत्रकार आणि अन्य एक व्यक्ती मारली गेली. या प्रकरणी आशिषविरुद्ध गुन्हेगारी कट आणि बेजबाबदारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मुलास अटक होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत चालला आहे. वास्तविक जीपने शेतकऱ्यांना चिरडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आशिष याला अटक व्हावी म्हणून दबाव वाढत चालला होता.

स्वत: निर्दोष असल्याचे सांगत राहिला, पण पुरावे देताना फुटला घाम
आशिष याला शनिवारी सकाळी ११ वाजता क्राईम ब्रँचने कार्यालयात बोलावले. तो सकाळी साडेदहाच्या सुमारास आमदार योगेश वर्मा आणि आपल्या वकिलासोबत गुन्हे शाखेच्या कार्यालयात आला. डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने एसडीएमच्या उपस्थितीत चौकशी केली. आशिषने घटनास्थळापासून दूर एका समारंभात असल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि १० लोकांचे शपथपत्र सोपवले. त्यात म्हटले आहे की, घटना घडली तेव्हा आशिष वाहनात नव्हता. तथापि, एसआयटीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देताना त्याला घाम फुटला.

बातम्या आणखी आहेत...