आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखीमपूर खिरी शेतकरी हत्याकांड प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह १३ आरोपींवर मंगळवारी आरोप निश्चित केले जाणार आहेत. या प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी सर्व आरोपींचा याचिका अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी फेटाळली. गतवर्षी ३ ऑक्टोबर रोजी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना एसयूव्हीखाली चिरडल्याचा आरोप आशिषवर आहे. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी एक चालक आणि दोन भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करीत त्यांना ठार मारले होते. या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.