आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखीमपूर खिरी:लखीमपूर खिरी हिंसाचार; साक्षीदारावर गोळीबार

लखीमपूर खिरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार आणि भारतीय किसान युनियनचे नेते दिलबागसिंग यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला. दिलबाग मंगळवारी रात्री आपल्या गाडीने घरी परतत असताना दुचाकीस्वार बदमाशांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तथापि, दिलबागिसंग यांना इजा पोहोचली नाही. दिलबाग यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी कारचे दरवाजे आणि खिडक्या उघडण्याचा प्रयत्न केला. अयशस्वी ठरल्याने चालकाच्या बाजूने काचेवर दोन गोळ्या झाडल्या. दिलबाग लखीमपूर हिंसाचार प्रकरणात साक्षीदार आहेत. या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी मंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिष अटकेत आहे.

बातम्या आणखी आहेत...