आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेव्हा राजकारणाबद्दल बोलले जाते, तेव्हा एक नाव सर्वांच्याच जीभेवर असते, ते म्हणजे लालू प्रसाद यादव. लालूंनी त्यांच्या हटके लूक, त्यांची बोलण्याची पध्दत आणि त्यांची ऐट यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. सध्या मात्र लालू यांना किडनी आणि हृदयासह अनेक समस्या असून डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे. तर लालू यांना त्यांची मुलगी रोहिणी आचार्य किडनी देणार आहेत.
तपासणीनंतर सिंगापूरच्या डॉक्टरांनी लालूंना किडनी प्रत्यारोपणाची परवानगी दिली आहे. रोहिणी आचार्य सिंगापूरमध्ये राहतात. उपचारासाठी लालूप्रसाद गेल्या महिन्यात सिंगापूरला गेले होते. या महिन्यात लालू पुन्हा सिंगापूरला जाऊन किडनी प्रत्यारोपण करू शकतात.
न्यायालयाच्या परवानगीनंतर पुन्हा सिंगापूरला जाणार
लालू प्रसाद यांना किडनी, मधुमेह, हृदयासोबतच अनेक आजार आहेत. त्यामुळे त्यांना किडनी प्रत्यारोपणासाठी अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. लालू प्रसाद यांच्यावर दिल्ली एम्सच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लालूप्रसाद यांना उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले होते.
ऑक्टोबरमध्ये लालू प्रसाद उपचारासाठी सिंगापूरला गेले होते. तेथे त्यांच्या अनेक आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. सध्या ते त्यांची मोठी मुलगी मीसा भारती हिच्या दिल्लीतील निवासस्थानी राहत आहेत. मीसा भारतीही लालू प्रसाद यांच्यासोबत सिंगापूरला गेल्या होत्या. पुन्हा सिंगापूरला जाण्यासाठी त्यांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
लालू प्रसाद 24-25 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा सिंगापूरला जाणार
लालू प्रसाद 24-25 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा सिंगापूरला जाऊ शकतात, अशी माहिती आहे. रोहिणी आचार्य पतीसोबत सिंगापूरमध्ये आहेत. मागच्या वेळी लालूप्रसाद गेले होते. तेव्हा रोहिणी आचार्यांकडेच राहिले होते. मुलगी रोहिणी आचार्य यांच्याकडून किडनी घेण्यासाठी लालू प्रसाद यांना राजी केले जात असल्याचे सूत्रांकडून समजते.
लालू प्रसाद यांना 7 मुली
लालू यादव यांचा जन्म 11 जून 1948 ला बिहारच्या गोपालगंजमध्ये बिहारच्या गोपालगंजमध्ये झाला. त्यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेऊन त्यांच्या राजकीय करिअरची सुरूवात केली. वयाच्या 29 व्या वर्षीते लोकसभेसाठी निवडून आले. तर 1 जून 1973 ला त्यांचे लग्न राबड़ी देवी यांच्याशी झाले. लालू प्रसाद यांना 7 मुली आणि 2 मुले आहेत. ज्यामध्ये सर्वच मुलींचे लग्न झाले आहेत. लालूंच्या सर्व मुलींमध्ये त्यांची मोठी मुलगी मीसा भारती ही राजकारणात सक्रीय आहे, तर मुलगा तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव हे राजकारणात उतले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.