आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lalu Prasad Yadav Admitted To AIIMS In Delhi Due To Pneumonia And Difficulty In Breathing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लालू यादवांची प्रकृती चिंताजनक:निमोनिया आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे लालू प्रसाद यादव दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेडिकल बोर्डाच्या शिफारसीनंतर लालू यादव यांना एम्समध्ये भरती करण्यात आले

चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (72) यांना शनिवारी दिल्लीतील AIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी ते रांचीच्या RIMS मध्ये दाखल होते. RIMS चे डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी सांगितले की, ‘लालू यादव यांना निमोनिया झाला असून, मागील दोन दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत आहे.’मिळालेल्या माहितीनुसार, लालू यांच्या फुफ्फुसात पाणी भरले आहे.

मेडिकल बोर्डाने घेतला निर्णय

लालू यादव यांच्या आरोग्याच्या आधारे त्यांना उपचारासाठी बाहेर शिफ्ट करण्याच्या निर्णय घेण्यासाठी 8 सदस्यांचा मेडिकल बोर्ड बनवला होता. झारखंडचे तुरुंग महासंचालक बीरेंद्र भूषण यांनी सांगितले की, मेडिकल बोर्डाच्या सूचनेनंतर लालूंना दिल्लीत शिफ्ट करण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या आरोग्याबाबत दर आठवड्याला अपडेट मिळत राहतील.

रांचीवरुन शनिवारी संध्याकाळी दिल्लीकडे गेले

राजदचे बिहार प्रमुख अभय कुमार सिंह यांनी सांगितले की, रांची विमानतळावरुन लालू शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता रवाना जाले. त्यांच्या सोबत पत्नी राबड़ी देवी, मुलगा तेजस्वी आणि मुलगी मीसा होत्या. तेजस्वी यादव यांनी सांगितले की, वडिलांची तब्येत खूप चिंताजनक आहे. याबाबत मी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी चर्चा केली आहे.

लालूंना हे आजार, रोज 19 औषधे

लालू प्रसाद यादव यांना टाइप टू डायबिटीज, हायपरटेंशन, किडनी इंजरी अँड क्रोनिक किडनी डिजीज, पेरिएनल एब्सेस, प्रोस्थेटिक हायपरप्लेसिया, सेकंडरी डिप्रेशन, लो बॅक डिफ्यूज डिस्क, लेफ्ट आय एमेच्योर कॅटरेक्ट, राइट लोअर पोल रेनल, प्राइमरी ओपन अँगल ग्लूकोमा, हेट्रोजेनस थैलेसेमिया, विटामिन डी डेफिशिएंसी, ग्रेड वन फॅटी लीव्हर आहे. तसेच, त्यांचा वॉल्व रिप्लेसमेंटदेखील झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...