आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lalu Prasad Yadav BJP MLA Lalan Paswan Phone Call Recording Viral | Bihar Assembly Speaker Election Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमधून ब्रेकिंग:लालूंनी तुंरुंगातून केला भाजप आमदाराला फोन; तीनदा म्हणाले - विधानसभा स्पीकरच्या निवडणुकीत गैरहजर राहा

पाटणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशील मोदींनी ट्विट करून जाहीर केले लालूंचे कथित संभाषण

बिहारच्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी आज मतदान होणार असताना राष्ट्रीय जनता दल अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची कथित ऑडिओ क्लिप चर्चेत आहे. यामध्ये लालू प्रसाद यादव भाजप आमदार ललन पासवान यांच्याशी फोनवर बोलताना ऐकले जाऊ शकतात. यात लालू प्रसाद यादव म्हणतात की विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी गैरहजर राहा. लालू हेच वाक्य त्यांना तीनदा बोलत आहेत. सोबतच, तुम्हाला बढती देऊ असेही कथितरित्या लालू प्रसाद यादव म्हणाले आहेत.

नेमके काय म्हणाले लालू?

सुरुवातीला लालूंचा सहाय्यक बोलतो - हॅलो, प्रणाम सर, आमदार साहेब बोलत आहात का... तिकडून आवाज येतो नाही, त्यांचा पीए बोलतोय. त्यावर लालूंचा सहाय्यक बोलतो- द्या बरं त्यांना साहेब बोलतील लालू प्रसाद यादव साहेब... आमदाराचा पीए विचारतो- कुठून बोलताय साहेब? लालूंचा सहाय्यक- रांचीवरून बोलतोय, साहेब बोलतील... लालू- ह्म्म्म्, बोला पासवान जी, अभिनंदन... पासवान- प्रणाम, चरण स्पर्श... लालू: हो, ऐका, आम्ही तुम्हाला पुढे नेऊ तेथे... उद्या (25 नोव्हेंबर) स्पीकरसाठी मतदान होत आहे. आम्ही तुम्हाला मंत्री बनवू... उद्या यांना (जदयू-भाजप सरकार) पाडू... पासवान - आम्ही तर पक्षात आहोत ना सर... लालू - पक्षात असेल तर गैरहजर राहा. कोरोना झाले. स्पीकर (येथे आवाज स्पष्ट ऐकू येत नाही)... मग पुढचे आम्ही पाहून घेऊ ना... पासवान - पक्षात आहे सर, थोडंसं... ठीक आहे सर... लालू - गैरहजर राहा तुम्ही पासवान जी... पासवान - आपल्या माहितीसाठी आम्ही झालो सर... बोलतो... ठीक आहे... लालू - ठीक आहे.... अब्सेंट व्हा...

सुशील मोदींनी ट्विट करून जारी केले संभाषण

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser