आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आरजेडी प्रमुख लालू यादव यांना शनिवारी दिल्लीच्या एम्स येथे उपचारांसाठी पाठवले जाणार आहे. चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले लालूप्रसाद यादव सध्या रांचीच्या RIMS मध्ये दाखल आहेत. RIMS संचालकांच्या वतीने कारागृह व्यवस्थापनाच्या निर्देशानंतर 8-सदस्यीय वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. या पथकानेच लालू यांना दिल्लीत पाठवण्याचा निर्णय घेतला.
दोन रिपोर्टची केली जात आहे प्रतिक्षा
शुक्रवारी लालू यादवांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये निमोनिया व्यतिरिक्त सर्व रिपोर्ट सामान्य आल्या होत्या. यामध्ये इको, एक्स-रे, न्यूमोनिक, कोव्हिड, ब्लड, USG KUBP आणि HRCT चा समावेश आहे. HRCT आणि KUBP च्या रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे. यामधून फुफ्फुसांच्या संक्रमणाची माहिती मिळेल. फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संपूर्ण तपासणीचे रिपोर्ट येईपर्यंत रांचीमध्येच राहिल - तेजस्वी
लालू प्रसाद यादवांची तब्येत गुरुवारी अचानक बिघडली होती. त्यांना निमोनियासह श्वास घेण्यास त्रास होत आहे. याची सूचना मिळताच संपूर्ण कुटुंब रुग्णालयात दाखल झाले. शुक्रवारी संध्याकाळी पत्नी राबडी देवी आणि दोन्ही मुलं तेजप्रताप आणि तेजस्वी यांनी जवळपास 6 तास लालूंसोबत घालवले. मोठी मुलगी मीसा भारती शुक्रवारी सकाळपासून लालू यादव यांच्यासोबत आहे. तेजस्वी म्हणाले की, जोपर्यंत वडिलांचा पूर्ण तपासणी रिपोर्ट येत नाही तोपर्यंत रांचीमध्येच राहिली.
तेजस्वी यादव यांनी मीडियासोबत बोलताना म्हटले की, वडिलांच्या चेहऱ्यावर खूप सूज आहे. ते पहिल्यापेक्षा खूप जास्त कमजोर झाले आहेत.
29 महिन्यापासून RIMS मध्ये उपचार घेत आहेत लालू
लालू जवळपास अडीच वर्षांपासून RIMS मध्ये उपचार घेत आहेत. 29 ऑगस्ट 2018 ला त्यांना कार्डियोलॉजी बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. कार्डियोलॉजी विभागात कुत्र्यांच्या आवाजाने त्रस्त झाल्यानंतर 5 सप्टेंबर 2019 ला रिम्सच्या पेइंग वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 ला लालू यांना कोविड संक्रमणाच्या भितीने रिम्सचे RIMS डायरेक्टरच्या बंगल्यामध्ये शिफ्ट करण्यात आले होते. यानंतर डिसेंबरमध्ये बंगल्यामधून पेइंग वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.