आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंगापूरमधील एका रुग्णालयात सोमवारी राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांच्यावर किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया तासभर चालली. लालूंना त्यांच्या कन्या रोहिणी आचार्या यांनी किडनी डोनेट केली आहे. लालूंपूर्वी रोहिणीचे ऑपरेशन करण्यात आले. सध्या दोघेही ICU मध्ये आहेत.
लालूंचे छोटे सुपुत्र तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ते म्हणाले की, पप्पा शुद्धीत आहेत. बोलत आहेत. तुम्हा सर्वंच्या शुभेच्छांसाठी कोटी-कोटी आभार. मीसा भारतींनीही सोशल मीडियावर आपल्या वडिलांची प्रकृती चांगली असल्याचे म्हटले आहे.
ऑपरेशनपूर्वी रोहिणीने लालूंसोबतचे एक छायाचित्र ट्विट केले. त्यात त्या म्हणाल्या - रेडी टु रॉक एंड रोल. तुमचे कल्याण हेच माझे आयुष्य आहे. माझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे.
लालू व रोहिणी हे दोघेही सध्या रुग्णालयात दाखल आहेत. या दोघांचाही रक्तगट एबी पॉझिटीव्ह आहे. सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया झाली.
किडनी ट्रांसप्लांटपूर्वी लालूंच्या कन्या रोहिणीने ट्विटरवर रुग्णालयातील फोटो शेयर करत म्हटले आहे की, रेडी टू रॉक अँड रोल...दुसऱ्या ट्विटमध्ये रोहिणींनी लालूंची प्रकृतीच आपल्यासाठी सर्वकाही असल्याचे म्हटले आहे.
ट्रांसप्लांटपूर्वी रुग्णालयातील लालू व रोहिणीचे पहिले छायाचित्र पाहा...
ट्रांसप्लांटनंतर लालूंना 3 किडन्या होतील
रूबन रुग्णालय पाटण्याचे नेफ्रोलॉजिट्स डॉ. पंकज हंस यांनी सांगितले की, लालूंना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागेल. गर्दीपासूनही दूर रहावे लागेल. आहारही पौष्टिक घ्यावा लागेल. हळूहळू पेशंटचे हिमोग्लोबिन वाढत असताना ते जास्त प्रमाणात वाढणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. इम्यूनोसेप्रेसिव्ह औषधीच्या परिणामांमुळे रक्तदाबही वाढतो.
ट्रांसप्लांटनंतर लालूंना साफ-सफाईवर लक्ष्य द्यावे लागेल.
शरीरातून खराब झालेली किडनी काढली जात नाही. म्हणजे ट्रांसप्लांटनंतर लालूंच्या शरीरात आता 3 किडन्या होतील. रक्तदाब व इम्यूनोसेप्रेसिव्ह औषधी नियमितपणे वेळेवर घ्यावी लागेल. यावरच नव्या किडनीचे आयुष्य अवलंबून असेल. त्यात ट्रायक्रोलिमस किंवा सायक्लोस्पोरीन औषध असते. त्याचे लेव्हल योग्य प्रमाणात राखणेही महत्त्वाचे असते.
पत्नी राबडी देवी, मुलगी मीसा भारती व तेजस्वी यादवही सिंगापुरात
लालूप्रसाद यादव व रोहिणी आचार्यांना सध्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याची भेट घेण्याची परवानगी नाही. सोमवारी शस्त्रक्रिया झाल्यानंतर 48 तासांनी त्यांना त्यांची काचेच्या भीतींपलिकडून पाहता येईल. लालूंच्या पत्नी राबडी देवी, मोठी मुलगी मीसा भारती, सुपुत्र तेजस्वी यादव, लालूंचे निकटवर्तीय सुनील कुमार सिंह, भोला यादव व सुरेंद्र यादवही सिंगापूरमध्ये आहेत. किडनी डोनेट करणाऱ्या रोहिणींचे कुटुंब सिंगापूरमध्येच सेटल आहे.
लालूंसाठी कार्यकर्त्यांचे साकडे
किडनी प्रत्यारोपणानंतर लालूंना संसर्गापासून दूर राहण्यासाठी खास काळजी घ्यावी लागेल. त्यांचे समर्थकही त्यांच्या यशस्वी किडनी प्रत्यारोपणासाठी पाटण्यात पूजाअर्चा करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.