आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लालूप्रसाद यादवांना दिलासा:चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा केसमध्ये लालूप्रसाद यादवांना झारखंड हायकोर्टाने जामीन दिला, पण तुरुंगातून येऊ शकले नाहीत बाहेर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लालू यांना चारा घोटाळ्यासंबंधीत तीन केसमध्ये वेगवेगळी शिक्षा मिळाली होती, आतापर्यंत दोन केसमध्ये जामीन मिळाला आहे
  • तुरुंगातून बाहेर येण्यासाठी लालू यादवांना अजून एका प्रकरणात कोर्टाकडून जामीन घ्यावी लागणार आहे

चारा घोटाळ्याच्या चाईबासा प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांना शुक्रवारी जामीन मंजूर केला, पण ते तुरूंगातून बाहेर येऊ शकले नाहीत. प्रत्यक्षात चारा घोटाळ्याच्या तीन प्रकरणात त्यांना स्वतंत्रपणे दोषी ठरवण्यात आले होते. यातील दोन खटल्यांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला आहे. तुरुंगातून बाहेर येण्यासाठी त्यांना आणखी एका प्रकरणात जामीन घ्यावा लागेल.

लालूप्रसाद यादवांच्या नावावर चाईबारा, देवघर आणि दुमका ट्रेजरीमधुन अवैध पध्दतीने पैसे काढण्याच्या प्रकरणात शिक्षा झाली होती. त्यांना देवघर केसमध्ये 2019 मध्येच जामीन मिळाला आहे. दुमका केसमध्ये अद्याप जामीन मिळालेली नाही.

कधी, कोणत्या प्रकरणात, किती शिक्षा

  • 23 डिसेंबर 2017 ला देवघर ट्रेजरी मधून 84.53 लाख रुपये अवैध पध्दतीने काढण्याच्या प्रकरणात त्यांना साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
  • 24 मार्च 2018 ला दुमका ट्रेजरी मधून 3.13 कोटी रुपयांची अवैध पध्दतीने काढण्याच्या प्रकरणात 2 वेगवेगळ्या कलमांमध्ये लालूंना 7-7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, तर 60 लाखांचा दंडही लावण्यात आला होता.
  • 3 अक्टोबर 2013 मध्ये चायबासा ट्रेजरीमधून अवैध पध्दतीने 37.7 कोटी आणि 33.67 कोटी रुपये काढण्याच्या प्रकरणात पाच-पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूंच्या तीन शिक्षा एकाच वेळी सुरू आहेत.

23 डिसेंबर 2017 पासून तुरुंगात आहेत लालूप्रसाद यादव
लालूप्रसाद यादवांना चारा घोटाळ्याच्या देवघर ट्रेजरी केसमध्ये 23 डिसेंबर 2017 ला दोषी ठरवण्यात आले होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. त्यांना 17 मार्च 2018 ला तब्येत बिघडल्यावर रिम्स, नंतर दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांसाठी कोर्टाने 11 मे 2018 ला त्यांना सहा आठवड्यांचा जामीन देण्यात आला होता. हे वाढवून 14 ऑगस्ट, नंतर 27 ऑगस्ट 2018 करण्यात आला होता. कोर्टाने 30 ऑगस्ट 2018 ला लालूंना कोर्टात सरेंडर करण्याचे निर्देश दिले होते. यानंतरपासून ते रिम्समध्ये दाखल आहेत.

रिम्स डायरेक्टरच्या बंगल्यात राहून उपचार घेत आहेत
लालू यादव यांच्यावर सध्या रिम्सच्या डायरेक्टरच्या बंगल्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमण पाहता त्यांना रिम्सच्या पेइंग वार्डमधून रिमस् डायरेक्टरच्या बंगल्यामध्ये शिफ्ट करण्यात आले होते. लालूप्रसाद यांना शूगरसह 11 इतर आजार जडले आहेत. यामध्ये उच्च रक्तदाब, हृदय, मूत्रपिंडाचा रोग देखील समाविष्ट आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser