आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 वर्षांनंतर जवान चंद्रशेखरचा मृतदेह आढळला:1984 मध्ये PAK विरोधात लढताना झाले होते बेपत्ता, डिस्क नंबरने पटली ओळख

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सियाचीनमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणारे शहीद लान्स नायक चंद्रशेखर हरबोला यांचे पार्थिव तब्बल 38 वर्षांनी मंगळवारी त्यांच्या घरी पोहोचणार आहे. ते 19 कुमाऊं रेजिमेंटचे सैनिक होते. 29 मे 1984 रोजी सियाचीनवरील ऑपरेशन मेघदूतवेळी आलेल्या हिमवादळात ते शहीद झाले होते. तेव्हा त्यांचा मृतदेह आढळला नव्हता. तेव्हापासून त्यांचा शोध घेतला जात होता.

13 ऑगस्ट रोजी चंद्रशेखर यांचा मृतदेह आढळल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी त्यांचे पार्थिव उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे नेले जाईल. तिथे लष्करी इतमामात शहीद जवानावर अंत्यसंस्कार केले जातील.

13 ऑगस्ट रोजी सियाचीनमध्ये 16 हजार फूटांहून अधिक उंचीवर एका सैनिकाचा मृतदेह आढळला होता.
13 ऑगस्ट रोजी सियाचीनमध्ये 16 हजार फूटांहून अधिक उंचीवर एका सैनिकाचा मृतदेह आढळला होता.

29 मे 1984 रोजी आले होते हिमवादळ

उत्तराखंडच्या अल्मोडातील द्वाराहाटचे हाथीगूर बिंटा येथील चंद्रशेखर त्यावेळी 28 वर्षांचे होते. ते 15 डिसेंबर 1971 रोजी लष्करात भरती झाले होते. त्यांच्या बलिदानावेळी त्यांची मोठी मुलगी 8, तर छोटी मुलगी 4 वर्षांची होती. आता त्यांच्या पत्नीचे वय 65 वर्ष झाले आहे. पण त्यांना अजूनही आपले पती एकदिवस निश्चितच घरी येतील असा विश्वास होता.

16 हजार फूट उंचीवर लढले गेले ऑपरेशन मेघदूत

1984 मध्ये सियाचीनच्या मुद्यावरून भारत-पाकमध्ये युद्ध झाले. भारतीय लष्कराने 13 एप्रिल 1984 रोजी सियाचीन ग्लेशिअरवर ऑपरेशन मेघदूत लाँच केले. त्यात प्वॉइंट 5965 वर चंद्रशेखर यांच्या पथकाला पाठवण्यात आले. पण हिमवादळात अडकल्यामुळे त्यांचे 19 सदस्यीय गस्ती पथक बेपत्ता झाले. त्यानंतर 14 जणांचे मृतदेह आढळले. पण 5 जण अद्याप बेपत्ता होते.

लष्कराच्या डिस्क नंबरमुळे पटली ओळख

बर्फात दबलेल्या बंकर व मृतदेहाजवळ हरबोला यांचा डिस्क क्रमांक आढळला.
बर्फात दबलेल्या बंकर व मृतदेहाजवळ हरबोला यांचा डिस्क क्रमांक आढळला.

पण गत काही दिवसांत सियाचीन ग्लेशिअरवरील बर्फ वितळण्यास सुरू झाल्यानंतर लष्कराने पुन्हा या भागात शोधमोहिम राबवली. त्यात त्यांना लान्स नायक चंद्रशेखर हरबोला यांचा मृतदेह ग्लेशिअरवरील एका जुन्या बंकरमध्ये आढळला. हरबोलांची ओळख त्यांच्या डिस्क क्रमांकावरून झाली. हा नंबर त्यांना भारतीय लष्कराने दिला होता. त्यांच्या डिस्कवर 4164584 हा क्रमांक लिहिण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...