आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Land Can Be Purchased By Any Indian In Kashmir And Ladakh, Notification Issued By The Center

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन जमीन कायदा:काश्मीर आणि लडाखमध्ये कोणत्याही भारतीयाला खरेदी करता येणार जमीन, केंद्राने जारी केली अधिसूचना

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने मंगळवारी जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी नवीन जमीन कायद्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यानुसार आता काश्मीर आणि लडाखमध्ये कोणत्याही भारतीयाला जमीन खरेदी करता येणार आहे. दोन्ही केंद्रशासित प्रदेशात हा कायदा तात्काळ लागू करण्यात आला आहे. यापूर्वी काश्मीरमध्ये फक्त त्या राज्यातील व्यक्तीलाच जमीन खरेदी करता येत होती.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, याला जम्मू-काश्मीर पुनर्गठन 2020 चा तिसरा आदेश म्हणता येईल. कलम 370 हटवल्यानंतर केंद्राने जम्मू काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून पुनर्रचना केली. त्यांनतर आता जमीनीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घोषित करण्यात आला.

उमर अब्दुल्ला यांनी केला विरोध

नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेते उमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांनी ट्वीट केले की, 'जम्मू-काश्मीरच्या जमीन कायद्यात बदल करण्यात आले आहेत, हे सहन केले जाणार नाही. आता काश्मीरचा सेल सुरू होईल आणि लहान जमीन मालकांना याचा त्रास होणार.'

आधी काय कायदा होता ?

जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये कलम 370 आणि 35-A रद्द होण्यापूर्वी राज्याबाहेरील व्यक्तीला राज्यात जमीन खरेदी करता येत नव्हती.

आता काय बदल झाला ?

आता केंद्राने जमीन खरेदी करण्यासंबंधी बदल केले आहेत. यात जम्मू-काश्मीरच्या बाहेरील व्यक्तीलाही राज्यात जमीन खरेदी करता येईल. परंतू, बाहेरील व्यक्तीला राज्यातील शेती खरेदी करता येणार नाही, यावर अद्याप केंद्राने बंदी कायम ठेवली आहे.