आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमिटीचा बांधकाम न करण्याचा सल्ला होता:जोशीमठामध्ये वर्षापासून जमीन धसतेय, कुणी नाही घेतली दखल

उत्तराखंडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडच्या जोशीमठात नैसर्गिक आपत्तीचे चित्र असे दिसते की, जागोजागी खड्डे दष्टीस पडतात. ते किती खोल आहेत, याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. स्थानिक लोकांनुसार, खड्ड्यांत दगड फेकल्यावरही आवाज ऐकू येत नाही. भूगर्भ शास्त्रज्ञ एस.पी. सती म्हणाले की, खड्डेही भूस्खलन आणि त्याच्या आत मोठ्या भेगा पडल्याने होत आहे. स्थानिक प्रशासनाने अनेक खड्डे भरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.

“दिव्‍य मराठी’ने जोशीमठात जाऊन अनेक ठिकाणांची पाहणी केली. आपले घर सोडलेले रामकृष्ण म्हणलो,जमीन आधीपासून धसली होती. मात्र, नोव्हेंबर २०२१ पासून हा वेग वाढला आहे. यानंतर भीतीमुळे घर सोडावे लागले.औली रोडवरील सुनील गावच्या सुलोचना देवी म्हणतात की, सरकार-प्रशासन आमचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. एखाद्याचा जीव गेल्यानंतर, सरकारला जाग येईल,असे वाटते. मनोज रावत यांचे पूर्ण घर गडप झाले आहे. ते तीन मुले आणि पत्नीसह एका खोलीत भाड्याने राहत आहेत. ते म्हणाले, माझ्या पणजोबांनी येथे घर बांधले होते. ते सोडून आता भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. जोशीमठ अनेक कारणामुळे महत्त्वाचे आहे.येथे आद्य शंकराचार्याद्वारे सनातन धर्माच्या रक्षणासाठी देशातील चार ठिकाणी स्थापित धर्म ध्वजवाहक चार सर्वोच्च धार्मिक पीठापैकी एक ज्योतिर्पीठ आहे. उत्तराखंडाची प्राचीन राजधानी आहे. येथूनच सर्वोच्च तीर्थ बद्रीनाथची औपचारिकता पूर्ण होते. कारण, शंकराचार्यांची गादी येथे आहे.

इशाऱ्यानंतरही धरण व बोगदा तयार, यामुळे ओढवले संकट जोशीमठ बचाओ संघर्ष समितीचे संयोजक अतुल सती म्हणाले, १९७६ मध्ये प्रथम जोशीमठात मोठी भूगर्भीय हालचाल दिसली. तेव्हा यूपी सरकारने मिश्रा समितीची स्थापना केली. जोशीमठाच्या अस्तित्वाला धोका असल्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यंानी जोशीमठाच्या आसपास मोठे धरण आणि प्रकल्प न करण्याचा अहवाल दिला होता. मात्र, सध्या जोशीमठाच्या आसपास मोठे धरण बांधले आहे. सर्वात मोठा धोका तपोवन धरणातील बोगदा जोशीमठाखाली खोदला तेव्हा झाला. यामुळे जोशीमठाची जमीन धसण्याची प्रक्रिया सुरू झाली.

बातम्या आणखी आहेत...