आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Land Slide In Kinnaur Of Himachal Pradesh, Delhi And Chandigarh Tourist Died; News And Live Updates

हिमाचलमध्ये मोठी दुर्घटना:किन्नौरमध्ये भूस्खलनामुळे डोंगरातून पडले तोफांच्या गोळ्यासारखे दगड; 9 लोक ठार, पूल आणि वाहने नष्ट

किन्नौर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रामस्थांनी या घटनेची माहिती स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना दिली आहे.

हिमाचल प्रदेशातील कनौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे डोंगरावरून दगड इतक्या वेगाने खाली पडले त्यामध्ये बसपा नदीवरील पूलच कोसळला. या दुर्घटनेत 9 लोक ठार झाले असून 3 लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यासोबतच वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच किन्नौर डीसी आबिद हुसैन सादिक, एसपी एसआर राणा घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात हलवले असून मृतांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत.

दुर्घटनेतील लोक दिल्ली आणि चंदीगडीचे असून ते पर्यटनासाठी येथे आले असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा ते चितकुळहून सांगलाकडे जात होते, त्यावेळी बटसेरी येथील गुनसाजवळील नदीच्या पुलावर मोठे दगड आदळले आणि गाडी नदीत जाऊन पडली. मदत व बचावकार्य वेगाने सुरु आहे. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना दिली आहे.

मृतकांमध्ये यांचा समावेश

1. प्रतीक्षा सुनील पाटिल, सद्भावना नगर, सावनार पाटणसाबंगी, नागपूर, महाराष्ट्र

2. दीपा शर्मा, हीरापथ, मानसरोवर जयपूर

3. अमोघ प्रशांत बपत, एचटीपीएस कॉलनी, अन्नपूर्णा विहार, कोरबा दाडी छत्तीसगड

4. उमराव सिंग जुगल किशोर (ड्रायव्हर), रघुवीर नगर, टागोर गार्डन, पश्चिम दिल्ली

5. कुमार उल्हास वेदपाठक

6. अनुराग नंदकिशोर बियानी, परसरथ मार्ग, बजाज रोड, माधोगंज सीकर, राजस्थान

7. मायादेवी नंद किशोर बियानी, परसरथ मार्ग, बजाज रोड, माधोगंज सीकर, राजस्थान

8. ऋचा नंद किशोर बियानी, परसरथ मार्ग, बजाज रोड, माधोगंज सीकर, राजस्थान

9. सतीश एमएल कटकबर, छत्तीसगड

जखमींमध्ये यांचा समावेश

​​​1. शिरील अशोक ओबेरॉय, मोतीनगर रमेश नगर, पश्चिम दिल्ली

2. नवीन बलबीर सिंह भारद्वाज, रणजित नगर, खराळ, मोहाली पंजाब

3. रणजित सिंह (प्रवासी) मलबर, व्हीपीओ बटसेरी, ता. सांगला, किन्नौर.

बातम्या आणखी आहेत...