आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Landslide In Haryana | Haryana Landslide Dozens Feared Dead, Rescue Operation Is On Latest News And Updates

डोंगरच कोसळले:हरियाणात डोंगराचा भाग कोसळल्याने मोठ-मोठ्या मशीन्ससह 25 जण दबले, 3 मृतदेह बाहेर काढले; बचाव कार्य सुरुच

भिवानीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणातील भिवानीमध्ये खाणकाम करताना डोंगराला तडे गेल्याने 10 पेक्षा अधिक लोक दबले गेल्याची माहिती आहे. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक मशिनी डोंगराखाली दबल्या गेल्या आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने मीडियाला घटनास्थळी जाण्यास बंदी घातली आहे. यामध्ये छत्तीसगड आणि राजस्थानमधील कामगार आहेत. दगडाखाली किती लोक दबले गेले आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नसून सध्या बचावकार्य सुरू आहे.

डोंगरकळा कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि प्रशासन दाखल झाले.
डोंगरकळा कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि प्रशासन दाखल झाले.

शुक्रवारी सुरू झाले होते खाणकाम
भिवानीतील तोशाम परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगर खाणकाम सुरू आहे. प्रदूषणामुळे दोन महिन्यांपूर्वी खाणकाम बंद करण्यात आले होते. एनजीटीने गुरुवारी खाणकाम पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. यानंतर शुक्रवारपासून खाणकामाला सुरुवात झाली. दोन महिन्यांपासून खाणकाम बंद असल्याने परिसरात बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला होता. या टंचाईवर मात करण्यासाठी येथे मोठा स्फोट करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ढिगाराखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे आणि जखमींना रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू झाले.

डोंगराचा भाग आपोआप कोसळला की माइनब्लास्टिंगमुळे हे अद्याप कळालेले नाही.

घटनास्थळी रुग्णवाहिका सुद्धा दाखल झाल्या असून जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...