आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात रविवारी जम्मू-श्रीनगर महामार्गावर दरड कोसळली. पंथियाल भागात टी-5 बोगद्याच्या तोंडावर मोठे-मोठे दगड पडताना दिसले. यामुळे बोगद्यासमोर वाहनांनी यू टर्न घेतला. रामबनच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बोगद्याच्या प्रवेशद्वारावर दगड पडताना दिसत आहेत.
ही घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली. अनेक वृत्तानुसार, लष्कराच्या वाहनांवर दगड पडले असली तरी कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्ग बंद करण्यात आला. सुमारे दोन तास महामार्गावरील दगड हटवण्यात आले, त्यानंतर महामार्ग खुला करण्यात आला.
पाहा भूस्खलनाची छायाचित्रे...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.