आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडमध्ये जोशी मठात डोंगर खचत आहेत. जोशी मठ आणि प्रसिद्ध स्की रिसॉर्ट औलीदरम्यान ४.१५ किमी लांबीचा सर्वात मोठा रोप वे आहे. या रोप वेच्या टॉवरजवळ भूस्खलन सुरू झाले आहे. त्यामुळे डोंगर खचल्याने येथील दीडशेपेक्षा अधिक घरांना मोठे तडे गेले आहेत. जोशी मठामधील ३६ कुटुंबांना इतरत्र हलवण्यात आले आहे.
चमोली जिल्ह्यात जोशी मठापासून ८ किलोमीटर उंच डोंगरावर औली बुग्याल आहे. या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास जोशी मठासोबतच औलीमध्येही मोठे संकट येऊ शकते, असा इशारा भूगर्भशास्त्रज्ञांनी दिला आहे. सुमारे साडेनऊ हजार फूट उंचीवरील औलीचे अस्तित्वच संपुष्टात येऊ शकते. विशेष म्हणजे पुढील वर्षी फेब्रुवारी २०२३ मध्ये या ठिकाणी दक्षिण आशिया हिवाळी क्रीडा स्पर्धा प्रस्तावित आहेत. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात भूस्खलन वेगाने सुरू झाले, अशी माहिती जोशी मठ येथील रहिवासी रामकृष्ण यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिली. तर शासकीय समितीच्या अहवालात इशारा देऊनही या ठिकाणी तपोवन बंधाऱ्यासाठी भुयार तयार करण्यात आलेे, असा आरोप जोशी मठ बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल सती यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.