आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Large Plasma Donations From The Citizens Of Surat During The Corona Period; In Two Months, 950 People Donated 1600 Units Of Plasma

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्लाझ्मावीर:कोरोना काळात सुरतच्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा दान; दोन महिन्यात 950 लोकांनी केले 1600 युनिट प्लाझ्मा दान

सुरत3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रक्तपेढ्यांना सांगावे लागले, आता गरज नाही, रक्तदान करा

कोरोना काळात गेल्या दोन महिन्यात सुरतमधील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस, महापालिका कर्मचारी, हिरे कारागिर, व्यापारी व शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा दान केले की, रक्तपेढ्याना अखेर सांगावे लागले, आता प्लाझ्मा पुरेशा प्रमाणात जमा झालेला आहे. त्याऐवजी रक्तदान करा. सुरतच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले, आता सरकारी रुग्णालये, सामान्य व सुरत महापालिकेच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहेत. कोरोनामुळे सामान्य व सुरत महापालिकेच्या रुग्णालयातील रक्तपेढ्यांत एक युनिटही रक्त जमा नाही. जे रक्त जमा होेते, ते लवकर संपते. यामुळे प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी आलेल्या लोकांना आधी रक्तदान करण्याची विनंती करण्यात येते. गेल्या चार -पाच दिवसांपासून रक्तपेढ्या रक्तांसाठी त्रस्त आहेत. तर सुरत महापालिकेच्या रक्तपेढ्यात प्लाझ्मा देणाऱ्या लोकांना पुन्हा फोन करून बोलावले जात आहे. आता तुम्ही रक्तदान करा. गरज पडेल तेव्हा तुम्हाला प्लाझ्मासाठी बोलावण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

दोन महिन्यात 950 लोकांनी केले 1600 युनिट प्लाझ्मा दान

५ जुलै रोजी सुरत महापालिकेच्या रुग्णालयात पहिल्यांदा प्लाझ्मा दान करण्यात आला. तेव्हापासून आजवर ९५० लोकांनी १६०० युनिट प्लाझ्माचे दान केले. सरासरी दररोज २० ते युनिट प्लाझ्मा डोनेट होत आहे. दुसरीकडे एकाही सरकारी रक्तपेढ्यांत रक्तदान झालेले नाही. रक्तदान शिबिरे आयोजित करणारी व्हॅन पाच महिन्यांपासून कोठेही गेलेली नाही. आवाहनानंतर आता सुरतमध्ये रक्तदातेही रक्तदानासाठी पुढे येत आहेत.

महिन्यातून २ ते ३ वेळा प्लाझ्मा तर रक्तदान तीन महिन्यांतून एकदा

1 डॉक्टर सांगतात की, रक्तदान तीन महिन्यांतून एकदा करता येते. तर प्लाझ्मा महिन्यातून तीन वेळा दान करू शकता.

2 यंत्राद्वारे प्लाझ्मा काढून रक्त पुन्हा शरीरात चढवले जाते, तर रक्तदानात तसे होत नाही.

3 एक अथवा दोन दिवसाच्या अंतराने काेरोना रुग्णास एक अथवा दोन युनिट प्लाझ्मा दिला जातो.परंतु काही रुग्णांनाच याची गरज भासते. एकाच रुग्णास अनेक युनिट रक्ताची गरज पडू शकते. छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियेतही कमीत कमी चार युनिट रक्त लागू शकते.