आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lashkar E Taiba Terrorist Killed In Jammu Kashmir Encounter Latest News And Update

जम्मू काश्मिरात लश्करचा अतिरेकी ठार:श्रीनगरमध्ये 3 अतिरेक्यांना बेड्या, AK रायफलींसह पिस्तूलही जप्त

श्रीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय लष्कर व जम्मू काश्मीर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले होते.  - Divya Marathi
भारतीय लष्कर व जम्मू काश्मीर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले होते. 

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दल व अतिरेक्यांत झालेल्या चकमकीत लश्कर ए तोयबाचा अतिरेकी सज्जाद तांत्रे ठार झाला. एएनआयच्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांना रविवारी चेकी डूडू भागात काही अतिरेकी लपल्याची खबर मिळाली होती.

त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या सज्जादला हाताशी धरून पोलिस व भारतीय लष्कराने संयुक्त ऑपरेशन राबवले. त्यात अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी सज्जादला लागल्यामुळे त्याचा खात्मा झाला.

दुसरीकडे, श्रीनगरच्या बाहेरील भागात लष्कर व पोलिसांनी 3 हायब्रिड अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 AK रायफल्स, 2 पिस्तूल, 9 मॅगझिन व 200 बुलेट्स जप्त करण्यात आलेत.

13 नोव्हेंबर रोजी 2 मजुरांवर झाला होता हल्ला

तपासात निष्पन्न झाले की, हायब्रिड अतिरेकी सज्जाद तांत्रेने गत 13 नोव्हेंबर रोजी बिजबेहरात 2 स्थलांतरीत मजुरांवर हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर छोटा प्रसाद नामक एका मजुराचा 18 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

हल्ला झालेले दोन्ही मजूर उत्तर प्रदेशातील होते.
हल्ला झालेले दोन्ही मजूर उत्तर प्रदेशातील होते.

यंदा 176 अतिरेकी ठार

जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा सफाया करण्यासाठी पोलिस व लष्कराच्यावतीने सातत्याने मोहीम राबवली जात आहे. त्यात अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. चालू वर्षी ऑक्टोबरपर्यंत 176 अतिरेकी ठार झालेत. यापैकी 126 लोकल अतिरेकी होते. जम्मू व काश्मीरमध्ये सध्या एकूण 134 अतिरेकी सक्रीय आहेत. यापैकी 83 परदेशी व 51 स्थानिक अतिरेकी आहेत.

यंदा आतापर्यंत 21 टार्गेट किलिंग झाल्यात. त्यात काश्मिरी पंडित, राज्याबाहेरील स्थलांतरीत मजूर व सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. यंदा अतिरेक्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात 9 हिंदूंचा बळी गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...