आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक बॉम्बस्फोटांत सहभागाचा आरोप असलेल्या दहशतवाद्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. तो पूर्वी सरकारी शाळेत शिक्षक होता. जम्मूमधील नरवाल येथे झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटांच्या तपासादरम्यान रिसायी येथील आरिफ या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबागसिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मे महिन्यात यात्रेकरूंना वैष्णोदेवी येथे घेऊन जाणाऱ्या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात आरिफचा सहभाग होता. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर अन्य २४ जण जखमी झाले होते. धार्मिक वातावरण बिघडवणे व दहशतवाद भडकवणे हा यात्रेकरूंवरील हल्ल्यामागचा हेतू होता. पाकिस्तानातील सूत्रधारांच्या इशाऱ्यांवर आरिफ काम करीत होता. फेब्रुवारी २०२२मध्ये जम्मूमधील शास्त्रीनगर भागात ‘आयईडी’द्वारे घडवून आणलेल्या स्फोटाशिवाय नरवाल येथील दुहेरी स्फोटात सहभाग असल्याचे त्याने कबूल केले आहे. या स्फोटासाठी सीमेपलीकडून अत्याधुनिक ‘स्फाटके’ पाठवण्यात आले डिसेंबरच्या शेवटी ड्रोनच्या माध्यमातून ही स्फोटके पुरवण्यात आली होती.
स्प्रेचे बटण दाबून स्फोट
पोलिसांनी त्याच्याकडून परफ्युमच्या बाटलीला लावलेले स्फोटके जप्त केली. अशा स्वरुपाचा बॉम्ब प्रथमच जप्त केला आहे. बाटलीवरील स्प्रेचे बटण दाबून स्फोट घडवून आणला जातो. तज्ज्ञांचे पथक स्फोटकाची तपासणी करीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.