आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत-चीन सीमेवर शहीद झालेले स्पेशल फ्रंटियर फोर्सचे कमांडो नायमा तेनजिंग (५१) यांच्यावर सोमवारी लेहमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी लोकांनी भारतमातेचा जयजयकार केला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांच्या वेळी झालेल्या स्फोटात तेनजिंग शहीद झाले होते. नायमा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजप सरचिटणीस राम माधव आले होते. नायमा ज्या स्पेशल फोर्समध्ये तैनात होते त्याबाबत लोकांना जास्त माहिती नाही. या दलातील जवान शहीद झाल्यानंतर बातम्या जास्त येत नाहीत. मात्र, या वेळी असे झाले नाही. नायमा चुशुलच्या ब्लॅक टॉपवर चीनविरोधातील मोहिमेत शहीद झाले होते. २९-३० ऑगस्टच्या रात्री भारतीय जवानांनी लडाखच्या पँगाँग भागात चीनची घुसखोरी अयशस्वी केली होती. मोहिमेत तिबेटी जवानांची विकास रेजिमेंटही सामील होती. या रेजिमेंटमध्ये तिबेटचे स्थलांतरित लोक आणि गोरिला युद्धात तरबेज सैनिकांना प्राधान्य दिले जाते.
३३ वर्षांपासून सैन्यात होते नायमा, कंपनी लीडर होते
नायमा स्पेशल फ्रंटियर फोर्समध्ये कंपनी लीडर हाेते. ते ३३ वर्षांपासून दलात होते. या दलाची स्थापना १९६२ मध्ये भारत-चीन युद्धावेळी झाली होती. तेनजिंगच्या शहीद होण्याबाबत केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली नव्हती. संरक्षण मंत्रालयाने २९- ३० ऑगस्टच्या रात्री चीनची घुसखोरी आणि भारतीय जवानांनी त्यांना मागे केल्याबद्दल माहिती दिली होती. नायमा यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.