आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून:प्रथमच 19 वर्षांनंतर उशिरा दिल्लीत पाेहाेचला मान्सून, आता दिल्लीसाेबतच देशभरात व्यापला

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढाच्या महिन्यातही उन्हाळ्यासारखा उकाडा सहन करत असलेल्या राजधानी दिल्लीत मंगळवारी मान्सूनचे आगमन झाले. मागील १९ वर्षांत पहिल्यांदाच मान्सूनला दिल्लीत पोहोचण्यात एवढा उशीर झाला. याशिवाय पाच दिवस उशिराने आलेला नैऋत्य मान्सून दिल्ली, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह संपूर्ण देशात पसरला आहे.

साधारणपणे ८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशात व्यापलेला असतो. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार २००२ मध्ये मान्सून १९ जुलै रोजी दिल्लीत पोहोचला होता, तर १९८७ मध्ये २६ जुलै रोजी मान्सूनने दिल्ली गाठली होती. हा आजवरचा विक्रमी उशीर होता. हवामान विभागाने याही वेळी मान्सून खूप लवकर दिल्लीत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. तथापि, अनेक वेळा हा अंदाज चुकला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील २४ तासांत वायव्य भारतातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडेल.

बातम्या आणखी आहेत...