आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजस्थानच्या जालोरमध्ये शनिवारी रात्री 10.45 वाजता मोठा अपघात झाला. एक बस 11 हजार वोल्टच्या हायटेंशन लाइनला धडकली आणि यामुळे बसमध्ये आग लागली. यामुळे 6 लोक जिवंत जळाले आहेत. 36 लोक या आगीत होरपळले आहेत. यामधून जास्तीत जास्त जालोर जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. काही लोकांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना जोधपूरला पाठवले आहे. सर्व लोक जैन समाजाचे आहेत, जे नाकोडा तीर्थवरुन दर्शन करन अजमेर आणि ब्यावर येथे परतत होते.
मृतांमध्ये ड्रायव्हर-कंडक्टर आणि 3 महिला
अपघातात ब्यावरच्या सोनल, सुरभी, चांद देवी, अजमेरचे राजेंद्र आणि ड्रायव्हर धर्मचंद यांचा मृत्यू झाला. कंडक्टरचाही मृत्यू झाला आहे. जे जखमी झाली आहेत त्यांच्यातील काहींची ओळख पटू शकली आहे. यामध्ये जयपूरच्या प्रियंका, अजमेरच्या निशा, ब्यावरच्या शकुंतला, अनौसी, भीलवाडाच्या शिल्पा बाफना, ब्यावरच्या सुनीता, जयपूरच्या सीमा, रितिका आणि शिल्पा यांचा समावेश आहे.
रस्ता भरकटल्याने महेशपूरा गावात पोहोचले
हा अफघात जालोर जिल्ह्यापासून 7 किमी दूर महेशपूरा गावात झाला. जैन श्रद्धाळू 2 बसमध्ये शुक्रवारी रात्री ब्यावरुन रवाना झाले होते. सर्व जालोर जिल्ह्याच्या जैन मंदिरमध्ये दर्शनासाठी पोहोचले. दर्शन केल्यानंतर रस्ता भरकटून ते महेशपूरा गावात पोहोचले. गावातील अरुंद गल्ल्यांमधून जात असताना एका बसचा धक्का 11 केवी लाइनला लागला आणि करंट पसरल्याने बसमध्ये आग लागली.
प्रत्यक्षदर्शी : कंडक्टर तार हटवत होता, याच वेळी करंट पसरले
बसमध्ये प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी सांगितले की, ते नाकोडानंतर मांडोलीमध्ये दर्शन करण्यासाठी गेलेहोते. शनिवारी उशीरा संध्याकाळी सर्व जालोर शहरात पोहोचले. येथे जेवण केल्यानंतर त्यांना ब्यावर येथे जायचे होते. गूगल मॅपवरुन ब्यावरचा रस्ता पाहत असताना बस पुढेजात होती. चुकून बस महेशपूरा गावात पोहोचली. गावाच्या गल्लीमध्ये 11 केवीची लाइन खूप खाली होती. कंडक्टर हायटेंशनची उंची पाहण्यासाठी बसवर चढला आणि तार हटवू लागला. याच वेळी करंट बसमध्ये पसरले आणि आग लागली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.