आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा ताजा अहवाल:एमबीबीएसच्या जागांत 8 वर्षांत 77% वाढ, तरी डॉक्टरांची 80% कमतरता

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २०१४-२०२२ मध्ये ६७% वाढले मेडिकल कॉलेज

देशात एकीकडे मेडिकल काॅलेजांची संख्या वेगाने वाढत आहे, तर दुसरीकडे आरोग्य केंद्रांना डॉक्टरांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. गेल्या ८ वर्षांत (२०१४-२०२२) देशामध्ये मेडिकल कॉलेज ३८७ ने वाढून ६४८ झाले. म्हणजेच ६७% वाढले. याचदरम्यान एमबीबीएसच्या जागाही ५४,३४८ ने वाढून ९६,०७२ (७७%) पर्यंत पोहोचल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा ताजा अहवाल ‘गव्हर्नन्स रिफॉर्म्स इन मेडिकल एज्युकेशनमधून (२०१४-२०२२)’ हे आकडे समोर आले. आणखी एक सरकारी अहवाल रूरल हेल्थ स्टॅटिक्स २०२०-२१ नुसार, देशातील पीएचसी (प्राथमिक आरोग्य केंद्र) आणि सीएचसीमध्ये (सामुदायिक आरोग्य केंद्र) ४.३% पासून ते ८०% पर्यंत डॉक्टरांची कमतरता आहे. २००५ मध्ये देशभरातील पीएचसीमध्ये एकूण २०,३०८ अॅलोपॅथिक डॉक्टर होते. ते २०२१ मध्ये ३१,७१६ झाले. तरीही गरजेच्या हिशेबाने हा आकडा कमी आहे. सीएचसीमध्ये गरजेच्या हिशेबाने ८३% सर्जन, ७४% स्त्रीरोगतज्ज्ञ, ८०% बालरोगतज्ज्ञ आणि ८२% चिकित्सकांची कमतरता आहे.

पीएचसीमध्ये ३१% महिला डॉक्टरांचीही कमतरता आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार देशात प्रति ८३४ माणसांसाठी एक डॉक्टर आहे. उल्लेखनीय म्हणजे देशात २७% डॉक्टर सक्रियच नाहीत.

चिंताही... देशाच्या आरोग्य क्षेत्राचे बजेट वाढवायला हवे होते, पण घटवण्यात आले... : {नॅशनल हेल्थ पॉलिसी-२०१७ अंतर्गत २०२५ पर्यंत आरोग्य बजेट जीडीपीच्या २.५% असले पाहिजे. मात्र, २०२२-२३ च्या बजेटमध्ये ते ०.३५% वर पोहोचले आहे. तर २०२०-२१ मध्ये १.१% होते.

{इकोनॉमिक सर्व्हेनुसार, झारखंडमध्ये प्रति १०,००० लेकांवर केवळ ४ डॉक्टर आहेत. राजस्थानात हा आकडा ५, पंजाब ६, छत्तीसगड ७, युपी-बिहार-हरियाणा-महाराष्ट्रात ८-८, गुजरात ९ व एमपीत ११ आहे.

{देशाच्या शहरी भागांत एकूण ५,४८१ पीएचसी आहेत. मात्र, लोकसंख्येनुसार ते ४४% कमी आहेत. केवळ ६६% पीएचसी सरकारी इमारतींत, तर २७% अजूनही भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत.

सुखद पैलू : सरकारी कॉलेज ९६%, खासगी ४२% वाढले {देशातील एकूण ६४८ मेडिकल काॅलेजपैकी ३५५ सरकारी व २९३ खासगी आहेत. २०१४ ते २०२२ दरम्यान सरकारी कॉलेज ९६% व खासगी ४२% वाढले आहेत. {२०१४ मध्ये सरकारी मदतीतून १५७ मेडिकल कॉलेज उघडण्यास मंजुरी देण्यात आली. यापैकी ९३ सुरू झाले, तर ६० कॉलेज दोन वर्षांत सुरू होण्याची अपेक्षा आहे. {गेल्या आठ वर्षांमध्ये मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये सर्वाधिक १०५% वाढ नोंदवण्यात आली आहे. या जागा ३०,१९१ ने वाढून ६३,८४२ झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...