आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने तिसरी दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टीम लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तीन दा विंची रोबोट असलेले हे देशातील पहिले आणि एकमेव हॉस्पिटल बनले आहे. जून २०१२ मध्ये दा विंची रोबोटिक सिस्टीमसह रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू केली आणि आज कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने रोबोटच्या मदतीने विविध प्रकारच्या ४५,००० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि मुलांसाठी यूरोलॉजी, स्त्रीरोग, इएनटी आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसह यूरो-ऑन्कोलॉजी, महिलांवरील कर्कराेज शस्त्रक्रिया, डोके आणि मान, फुफ्फुस आणि अन्ननलिका आणि कोलोरेक्टल कर्करोगासांी कर्करोग शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (केडी,एच) भारतात अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणण्यात आघाडीवर आहे आणि तिसऱ्या प्रगत दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टीमसह रोबोटिक न्यूनतम इनवेसिव्ह सर्जरीमध्ये अग्रेसर म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल हे देशातील पहिले हॉस्पिटल आहे ज्याने प्रोस्टेट, किडनी आणि मूत्राशयाच्या कर्करोगाच्या रूग्णांच्या उपचारांसाठी २,६०० हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.