आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील पहिली सी-प्लेन सर्व्हिस सुरू:मोदींनी केवडिया ते साबरमती हे 200 किमीचे अंतर 40 मिनिटांत केले पार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सी-प्लेनची सुविधा देणे मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदींनी नर्मदा जिल्ह्याच्या केवडियामध्ये देशातील पहिली सी-प्लेन सर्व्हिस सुरू केली. मोदींनी स्वतः सी-प्लेनचा प्रवास केला. मोदींना घेऊन सी-प्लेनने दुपारी जवळपास 1 वाजता केवडियामधून उड्डाण भरली आणि जवळपास 1.30 वाजता साबरमती रिव्हर फ्रंटवर पोहोचले. देशात सी-प्लेनची सुविधा देणे मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट होता.

एका बाजूचे भाडे 1500 रुपये
ही सर्व्हिस नर्मदा जिल्ह्याच्या केवडिया ते अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटपर्यंत सुरू झाली आहे. याचे भाडे 1500 रुपये ठेवण्यात आले आहे. सी-प्लेनने 200 किमीचे अंतर केवळ 40 मिनिटात पूर्ण होईल. बाय रोड एवढे अंतर पार करण्यात जवळपास 4 तास लागतात. सी-प्लेन पाणी आणि जमीनीवर लँड करु शकते. यासाठी रनवेचीही गरज नसते.

सी-प्लेनचे मेजरमेंट
वजन: 3377 किलो
फ्यूल कॅपेसिटी: 1419 लीटर
लांबी: 16 मीटर
उंची: 6 मीटर
फ्यूल पावर: 272 लीटर/तास
5670 किलो पर्यंत वजन पेलू शकते