आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड आणि दिल्लीत खंडणी, हत्या, ड्रग्ज आणि शस्त्रांचे नेटवर्क चालवणारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँग देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार कारागृहातून चालवत आहे. येथूनच तो आपला गुंड संपत नेहराच्या सूचनेवर लॉरेन्स टार्गेटचे नाव सांगतो.
ऑस्ट्रियात बसलेला त्याचा भाऊ अनमोल आणि कॅनडात बसलेला सहकारी सतींद्र सिंह गोल्डी बराड खंडणीचा कॉल करतो. पैसे न मिळाल्यास दुबईत बसलेला सचिन थापन ऊर्फ विश्नोई शूटर पाठवून हत्या व फायरिंग करवून घेतो. यासाठी हरियाणा, राजस्थान आणि पंजाबच्या टोळीतील ७० शूटर आहेत. खंडणीतून मिळणाऱ्या पैशांचा एक भाग चितौडगडमध्ये अफूचा व्यवसाय, राजस्थान आणि चंदीगडमधील दारू व्यवसायात आणि एक हिस्सा हवालामार्फत ब्रिटनला पाठवला जातो. ब्रिटनमध्ये लॉरेन्सचा सहकारी मोंटी हे पैसे गुंतवतो. मोंटी इटलीच्या ड्रग माफियांशीही संबंधित आहे.
असे आहे नेटवर्क
- हरियाणाच्या पटौडीचा रहिवासी रोहित खोड हरियाणा व दिल्लीत वसुली करतो. - राजस्थानच्या बिकानेरमध्ये रोहित गोदारा, गंगानगरमध्ये आशिष बिश्नोई आणि जॅक, धौलपूरमध्ये डाकू राम दत्त, जोधपूरमध्ये मंजू व त्याचा हस्तक खंडणी नेटवर्कशी जोडले. - पंजाबच्या अबोहरचा रहिवासी सचिन दुबईत आहे. तो खुनासाठी गँग ऑपरेट करतो. शूटर्सना खुनाची ऑर्डर देतो.
- टोळीला खंडणीतून मोठा पैसा मिळतो. याची वसुली हरियाणा, पंजाब, चंदीगड, राजस्थान आणि दिल्लीत होते. - वसुली करण्यासाठी व्यापारी, संगीत, चित्रपट उद्योगाशी संबंधित लोक आणि कबड्डी खेळाडूंवरही निशाणा साधला जातो. - लॉरेन्सने ७ वर्षांत अमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय जाळे तयार केले. मेक्सिकोत अमली पदार्थ तस्करांशी त्याचा संबंध आहे.
१२ वर्षांपूर्वी पहिला एफआयआर दाखल
अबोहरचे ठाणे क्षेत्र बहाववालाच्या दूतरवाली गावचा रहिवासी लॉरेन्स बिश्नोईवर २०१० मध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान गोळीबाराच्या आरोपात पहिला गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा तो १९ वर्षांचा होता. २०१५ मध्ये शिकत असताना २२ गुन्हे दाखल झाले. त्यात १० हेतुपुरस्सर हत्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.