आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lawyer Prashant Bhushan 2009 Contempt Case News Updates; Supreme Court Convicted Activist Advocate Prashant Bhushan

प्रशांत भूषण दोषी:सरन्यायाधीश आणि 4 माजी मुख्य न्यायाधीशांचा अवमान प्रकरण, सुप्रीम कोर्ट म्हणाले - कंटेम्नर विरोधात गंभीर आरोप

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशांत भूषण यांना यापूर्वी अवमानाची नोटीसही देण्यात आली होती

सर्वोच्च न्यायालयाने अवहेलना प्रकरणात वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांना दोषी ठरवले आहे. प्रशांत यांनी सरन्यायाधीश एस.ए बोबडे आणि 4 माजी सीजेआयच्या विरोधात ट्विट केले होते. आता 20 ऑगस्ट रोजी शिक्षेसंबंधीची सुनावणी होणार आहे.

न्यायाधीश अरुण मिश्रा, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांच्या ट्विट्सवर निकाल दिला. खंडपीठाने म्हटले की, कंटेम्नर (अवमान करणारा) विरोधातील आरोप गंभीर आहेत. याप्रकरणी कोर्टाने स्वतः दखल घेतली होती.

ट्विटमध्ये काय लिहिले होते?

एका ट्विटमध्ये प्रशांत भूषण यांनी कथितरित्या लिहिले होते की, न्यायव्यवस्था लोकशाही वाचवण्यासाठी काहीही करत नाही. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी न्यायमूर्ती बोबडे यांनी कोरोना काळात न्यायालये बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांच्यावर टीका केली होती.

ट्विटरला विचारले होते - ट्वीट का हटवले नाहीत?

सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी मागील महिन्यात ट्विटरदेखील विचारले होते की, अवमाननेची कार्यवाही सुरू झाल्यानंतर ट्विट डिलीट का केले नाहीत? यावर ट्विटरकडून वकील साजन पोवैया म्हणाले की, "कोर्टाने आदेश जारी केल्यास ट्विट डिलीट केले जाऊ शकते." कंपनी स्वतःहून कोणतेही ट्विट डिलीट करू शकत नाही.

प्रशांत भूषण यांना यापूर्वी अवमानाची नोटीसही देण्यात आली होती

प्रशांत भूषण यांना नोव्हेंबर 2009 मध्ये देखील सर्वोच्च न्यायालयाने अवमाननेची नोटीस दिली होती. तेव्हा त्यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायाधीशांवर टिप्पणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...