आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमध्ये ९ जानेवारीपासून अतिक्रमणाविरोधी मोहीम सुरू आहे. आजवर १४ लाख कनाल म्हणजेच १.७५ लाख एकर सरकारी जमिनीवरील नेते व प्रभावशाली व्यक्तींची अवैध बांधकामे बुलडोझरने पाडून जागा माेकळी करण्यात आली. राज्यात २.७५ लाख एकर जमीन आहे. महसूल सचिव विजयकुमार बिधुरी म्हणाले, ७ लाख कनालवरील अतिक्रमण काढण्याचे व जमिनीवर कुंपण घालण्याचे काम सुरू आहे.
माेहिमेत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांना सर्वाधिक फटका बसला. गुरुवारी निदाज हॉटेलची ४० कनाल जागा मोकळी केली. त्यावरील मालमत्ता माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या निकटवर्तीयांची हाेती. पक्षाचे सरचिटणीस अली मोहम्मद सागर यांच्या पत्नीच्या मालकीची इमारतही पाडली.
जम्मू-काश्मीर काँग्रेसचे माजी अध्यक्ष पीरजादा मोहम्मद सईद, माजी पीडीपी मंत्री सय्यद फारूक अंद्राबी यांचे कुटुंब आणि माजी मुख्यमंत्री सय्यद मीर कासिम यांच्या नातेवाइकांच्याही ताब्यातील जमिनीही साेडविण्यात आल्या आहेत.
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचीही २३ कनाल जमीन ताब्यात
भाजप नेते व माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांच्या ताब्यातील २३ कनाल जमीन प्रशासनाने परत घेतली आहे. गेल्या आठवड्यात, श्रीनगर प्रशासनाने एका दिवसात ५०९ कोटींची ४९४ कनलांहून जास्त माेक्याची जागा माेकळी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.