आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Leaders Of Uttarakhand, Manipur And Goa Met At Amit Shah's House And Agreed On Chief Minister Names

3 राज्यांतील CM च्या नावांची लवकरच घोषणा:अमित शाह यांच्या घरी झाली उत्तराखंड, मणिपूर व गोव्याच्या नेत्यांची बैठक, नावांवर झाले मतैक्य

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिपूर, गोवा व उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळू शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या येथील निवासस्थानी शनिवारी झालेल्या एका बैठकीत या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार उत्तराखंडमध्ये आज होणाऱ्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाईल. तर मणिपूरच्या मुख्यमंत्र्याचे नाव अंतिम करण्यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण व किरिण रिजिजू आज इंफाळला जातील. गोव्यात प्रमोत सावंत यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहण्याची शक्यता आहे.

अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, मणिपूरचे काळजीवाहू मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह व गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी.एल. संतोष हजर होते.

केंद्रीय मंत्री सीतारमण, रिजिजू इंफाळला जाणार

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण व किरण रिजिजू पक्ष निरिक्षक म्हणून रविवारी इंफाळला जाणार आहेत. त्यांच्यासोबत बीरेन सिंह व विश्वजित सिंहही असतील. तिथे ते भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होतील. आतापर्यंत बीरेन सिंह यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम राहील असा दावा केला जात होता. पण, आता या शर्यतीत ज्येष्ठ आमदार टी. विश्वजित सिंह यांचे नाव पुढे आले आहे. यापूर्वी पक्षाने या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीला बोलावले होते.

उत्तराखंडमध्ये आज भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीला 10 दिवसांचा अवधी लोटल्यानंतर नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी रविवारी डेहराडूनमध्ये भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यात राजनाथ सिंहि व परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी निरिक्षक म्हणून हजर राहणार आहेत. यावर अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय संसदीय मंडळ घेईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, 22 किंवा 23 तारखेला उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. भाजपच्या गोटात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. हा समारंभ डेहराडूनच्या परेड ग्राऊंडवर होईल.

गोव्यात प्रमोद सावंत यांची खूर्ची कायम

गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, सावंत हे पुन्हा मुख्यमंत्री होतील यात कोणतीही शंका नाही. याची 2 कारणे आहेत. एक -प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात भाजपला गोव्यात मोठा विजय मिळाला. दोन -त्यांना विजयी झालेल्या 20 पैकी 17 आमदारांचे समर्थन प्राप्त आहे. पण, यासंबंधीचा कोणताही निर्णय भाजपश्रेष्ठी घेतील.

बातम्या आणखी आहेत...