आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Leaked Gas Styrene In Visakhapatnam; If Breathed In, Kills Life In 10 Minutes, Cancer Results In Long Effect

विषारी गॅसची केमेस्ट्री:एलजी प्लांटमध्ये लीक झालेली गॅस 181 वर्षांपूर्वी शोधलेली स्टायरीन आहे; शरीरात गेल्यावर 10 मिनीटात मृत्यू होऊ शकतो

विशाखापट्‌टनम3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 181 वर्षे जुना आहे स्टायरीनचा इतिहास, शरीरात गेल्यावर तात्काळ परिणाम

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनममध्ये गुरुवारी एलजी कंपनीच्या केमिकल प्लांटमधून जी गॅस लीक झाली आहे, त्याचे नाव स्टायरीन (styrene) गॅस आहे. पोलिस कमिशनर राजीव कुमार मीणा यांनी सांगितल्यानुसार, रिपोर्टनुसार, आधीपासून प्लांटमधून स्टायरीन गॅसची गळती होत होती, पण लोकांना याबाबत काहीच माहिती नव्हती. डॉक्टरांचे म्हणने आहे की, स्टायरीन एक न्यूरो-टॉक्सिन आणि जीवघेणी गॅस आहे. शरीरात गेल्यावर फक्त 10 मिनीटात मृत्यू होऊ शकतो. या गॅसवर झालेल्या स्टडीमध्ये याला कँसर आणि जेनेटिक म्यूटेशनचे कारण सांगण्यात आले आहे.

181 वर्षे जुना आहे स्टायरीनचा इतिहास

जगात स्टायरीनला पहिल्यांदा अंदाजे 181 वर्षांपूर्वी यूरोपच्या संशोधकांनी शोधले होते. 1839 मध्ये, जर्मन शास्त्रज्ज्ञ एडुअर्ड सायमनने अमेरिकी स्वीटगम झाडातून निघालेल्या लाळ किंवा रेजिन (वाष्प किंवा स्ट्रेक्स) मधून एका वाष्पशील स्तराला वेगळे केले होते. त्यांनी याला

"स्टायलोल" (आता स्टायरीन) नाव दिले होते.

त्यांनी हेदेखील पाहीले की, जेव्हा स्टायलोलला हवा, प्रकाश किंवा गर्मीच्या संपर्कात आणल्यानंतर एक कठोर, रबरसारखा पदार्थ बनला, त्याला त्यांनी "स्टायलर ऑक्साइड" नाव दिले. 1845 मध्ये जर्मन केमिस्ट ऑगस्ट हॉफमॅन आणि त्यांचा विद्यार्थी जॉन बेलीथने स्टायलिनचा फॉर्मूला दिला, जो कीC8H8 नावाने लोकप्रिय झाला. यात कार्बनचे 8 आणि हायड्रोजनचे 8 अणु जोडले गेले आहेत.

पीवीसी गॅस उपयोगी आहे

याला बोली भाषेत पीवीसी गॅस किंवा विनाइल बेंजीनदेखील म्हटले जाते. याचा उपयोग पॉलीविनाइल क्लोराइड (पीवीसी) चे रबर, रेसिन, पॉलिस्टर आणि प्लास्टिक उत्पादनात केला जातो. पीवीसी एक सिंथेटिक प्लास्टिक आहे, जो की कठोर किंवा लवचीक फॉर्ममध्ये आढळून येतो. हा खासकरुन बॉटल किंवा पाइप बनवण्यासाठी उपयोगात येतो.

अंदाजे 99% इंडस्ट्रिअल रेजिन स्टायरीनपासून बनते. यात सहा प्रमुख घटक: पॉलीस्टायनिन (50%), स्टायलिन-ब्यूटाडीन रबर (15%), अनसैचुरेटड पॉलिएस्टर रेजिन (ग्लास ) (12%), स्टायरीन-ब्यूटाडीन लेटेक्स ( 11%), एक्रिलोनिट्राइल-ब्यूटाडीन-स्टायरीन (10%) आणि स्टायरीन-एक्रिलोनिट्राइल (1%) आहेत.

गोड वासाच्या गॅसची केमेस्ट्री

स्टाइरीन एक ऑर्गेनिक कम्पाउंड आणि याला एथेनिल बेंजीन, विनाइल बेंजीन आणि फेनिलिथीन म्हणून ओळखले जाते. याचा केमिकल फॉर्मूला C6H5CH = CH2 आहे. हा सर्वात लोकप्रिय ऑर्गेनिक सॉल्वेंट बेंजीनपासून तयार झालेला पाण्यासारखा हलका पिवळा पदार्थ आहे,यातूनच गॅस तयार होते. हा पदार्थ सोप्या पद्धतीने तापमाणावर गॅस म्हणून हवेत मिसळतो आणि यातून एक गोड वास येतो. स्टायरीनमधून पॉलीस्टायरीन आणि इतर अनेक को-पोलिमर बनवले जातात. यांचा उपयोग अनेक पॉलीमर उत्पादने (प्लास्टिक, फायबर ग्लास, रबर, पाइप) बनवण्यासाठी केला जातो.

शरीरात गेल्यावर तात्काळ परिणाम

स्टायरीन गॅस नाकात गेल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास कोंडू शकतो आणि डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो. शरीरात केल्यावर उलटी, श्वसनास त्रास आणि शरीरावर डाग येऊ शकतात. रोग नियंत्रण केंद्र (सीडीसी) नुसार याचा जास्त परिणाम लहान मुले आणि वृद्धांवर होतो.

अनेक दिवसापर्यंत प्रभाव

स्टायरीनच्या संपर्कात येऊनही जे लोक वाचतात, त्यांना भविष्यात याच्या घातक परिणामांचा सामना करावा लागतो. न्यूरोटॉक्सिन असल्या कारणाने याचा शरीरावर घातक परिणाम होऊन डोकेदुखी, थकावट, कमजोरी आणि नर्वस सिस्टीमवर वाईट परिणाम टाकू शकतो. याच्या प्रभावामुळे हात-पाय सुन्न पडणे, डोळांना नुकसान, ऐकू न येणे आणि त्वचेवर डर्मीटाइटिससारखे आजार दिसू लागतात.

तात्काळ उपचार

गॅसच्या संपर्ता आल्यानंतर तात्काळ त्वचा आणि डोळे धुणे आणि श्वसातून शरीरात गॅस केली असेल, तर रुग्णालयात जाऊन ब्रीदिंग सपोर्ट घेणे गरजेचे आहे.

भोपाळची मिक Vs विशाखापट्टनमचे स्टायरीन गॅस

मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये अमेरिकी यूनियन कार्बाइड कंपनीच्या कारखान्यात 3 डिसेंबर 1984 ला 42 हजार किलो विषारी गॅस लीक झाल्यामुळे अंदाजे 15 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तसेच लाखोंवर याचा वाईट परिणाम झाला होता. ही गॅस एक ऑर्गेनिक कम्पाउंडमधून निघालेली मिथाइल आयसोसाइनेट किंवा मिक गॅस होती, जी कीटनाशक आणि पॉली प्रॉडक्ट बनवण्यासाठी वापरली जाते.

इतक्या वर्षानंतरही या गॅसचा परिणाम भोपाळ शहरात दिसून येतो. येथील हजारो लोक आजही अपंगत्व, कँसर आणि डोळ्यांच्या विकाराने त्रस्त आहेत. विशाखापट्टनम प्लांटमधील स्टायरीनमुळे 10 मिनीटात मृत्यू होऊ शकतो, तर मिक गॅसमुळे काही सेकंदातच मृत्यू होतो.

बातम्या आणखी आहेत...