आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण नाव विसरतो, तसेच शब्दही विसरतो. कोणत्याही व्होकॅब्युलरी अर्थात शब्दसंग्रहाला सातत्यने फर्टिलायझेशनची गरज असते. अन्यथा ती संपुष्टात येते. - एव्हलिन वॉ (इंग्लिश लेखक)
करिअर फंडात स्वागत!
इंग्रजीवर वर्चस्व म्हणजे करिअर ग्रोथ व स्ट्राँग इंग्रजीसाठी स्ट्राँग व्होकॅब्युलरीची गरज असते. आज मी तुम्हाला 10 मिनिटांत 40 इंग्रजी शब्द शिकवेल. बस तुम्ही लक्षपूर्वक वाचा व लिहितही चला (शक्य असेल तर).
“रुट वर्ड्स”ची जादू - इंग्रजी शब्दसंग्रह झाला सोपा
बहुतांश इंग्रजी 'रुट वर्ड्स' ग्रीस किवा लॅटीन भाषेतून आलेत. रुड वर्ड्सच्या माध्यमातून व्होकॅब्युलरी तयार करण्यासाठी एक चांगला पर्याय हा आहे की, प्रथम रुट वर्ड पाहा व त्यानंतर त्याच आधारावरील परिचित उपसर्ग (प्रीफिक्स) व प्रत्यय (सफिक्स) शोधा.
सुरू करूया 40 वर्ड्सची यात्रा, 10 मिनिटांत
मी तुम्हाला मूळ शब्द (रूट वर्ड) देईल आणि त्यानंतर त्यापासून बनवलेले इंग्रजी शब्द व अर्थ.
1) Theo - शब्द 'theo' ग्रीकमधून येतो. त्याचा अर्थ आहे "ईश्वर''.
या रुटमधून आपल्यालला हे शब्द मिळतात–
ATHEISM (उच्चार - इथिझम) - एखाद्या देवाच्या अस्तित्वावर विश्वास;
ATHEIST (थीएस्ट) – नास्तिक;
MONOTHEISM (मोनोथेइझम) - एकेश्वरवादाचा सिद्धांत;
POLYTHEISM (पॉलीथेइझम) - एकाहून अधिक देवांवर विश्वास;
THEOCRACY (थिओक्रॅसी) - ईश्वरी आदेशाने चालणारे सरकार;
THEOLOGY (थिओलॉजी) - धार्मिक श्रद्धा, अभ्यास व अनुभवाचा अभ्यास;
THEOSOPHY (थिओसोफी) - रहस्यमय अंतदृष्टीच्या आधारावर देव व जगाचे शिक्षण;
PANTHEON (पॅनथेऑन) - सर्वच देवांना समर्पित एक मंदिर.
एकूण 8 शब्द झाले. मजा आली? सोपे आहे ना?
2) Bene - शब्द 'bene' लॅटिन आहे. त्याचा अर्था आहे “अच्छा”.
या रुटमधून आपल्याला हे शब्द मिळतात –
BENIGN (उच्चार - बिनाइन) - दयाळु, कोणतेही नुकसान नाही
BONA FIDE (बोना ˈफाइड) - वास्तविक, खरे
BENEDICTION (बेनेडिक्शन) - शुभेच्छा व्यक्त करणे;
BENEFACTOR (बेनेफॅक्टर) - कुणीतरी मदतनीस;
BENEFICENT (बेनेफिसेंट) - चांगले काम करणे किंवा चांगले उत्पादन करणे;
BENEFICIAL (बेनेफिशियल) - फायदेशीर;
BENEFIT (बेनिफिट) - जे कल्याणाला प्रोत्साहन देते;
BENEVOLENT (बेनव्होलेंट) – सद्भावनेचे प्रतीक.
एकूण 16 शब्द झाले. मजा आली? सोपे आहे ना?
3) Malus – शब्द ‘malus’ लैटिनमधून येतो. त्याचा अर्थ आहे “वाईट किंवा हानिकारक”.
या रुटमधून आपल्याला हे शब्द प्राप्त होतात – (वर दिलेल्या 8 हून हे एकदम उलट आहे)
MALIGN (उच्चार - मˈलाइन्) - दुर्भावनापूर्ण निंदा करून बदनामी करणे;
MALA FIDE (मेला फाइड) - वाईट हेतूने काही करणे;
MALEDICTION (मेलडिक्शन) - अपमानास्पद शब्द;
MALEFACTOR (मेलफॅक्टर) - गुन्हा किंवा वाईट करणारा;
MALEFICENT (मेलफिसेंट) - नुकसान करणारी स्थिती;
MALAISE (मˈलेज) - आजारी वाटण्याची सामान्य स्थिती;
MALCONTENT (मॅल्कंटेंट) - असमाधानी असणारा व वाईट परिस्थिती बदलण्याची इच्छा असणारा;
MALEVOLENT (मेलव्होलेंट) - द्वेष किंवा घृणा.
एकूण 24 शब्द झाले. मजा आली? सोपे आहे ना?
4) Plac - शब्द 'plac' लॅटीनमधून येतो, त्याचा अर्थ होतो, “खूश किंवा संतुष्ट करणे”.
या रुटमधून आपल्याला हे शब्द मिळतात-
COMPLACENT (उच्चार - कम्प्लेसन्ट) - स्वतःच्या क्षमतेवर समाधान वाटणे व प्रयत्न सोडून देणे;
IMPLACABLE (इम्प्लेकेबल) - बदलण्यास (समजण्यास) तयार नसणे;
PLACATE (प्लॅकेट) - एखाद्याला रागापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणे;
PLACEBO (प्लॅसिबो) - एक औषध, जी औषधी नसून केवळ आश्वासन आहे;
PLACID (प्लसिड) - शांत स्वरूप किंवा वैशिष्ट्ये असणे.
एकूण 29 शब्द झाले. अवघड तर नाही?
5) Anglo – शब्द 'anglo' लॅटीनमधून येतो. त्याचा अर्थ 'इंग्लिश किंवा ब्रिटिश' असा होतो.
या रुटमधून आपल्याला हे शब्द मिळतात–
ANGLOMANIA (उच्चार - अँग्लोमॅनिया) - इंग्रजी रितीरिवाजांची अत्याधिक प्रशंसा;
ANGLOPHOBIA (अँग्लोफोबिया) - ब्रिटनची भीती;
ANGLOPHONE (अँग्लोफोन) - इंग्रजी बोलणारा व्यक्ती;
ANGLO-INDIAN (अँग्लो-इंडियन) - इंग्रजी वंशाचा भारतीय व्यक्ती;
ANGLOPHILE (अँग्लोफाइल) - ब्रिटन व त्याच्या संस्कृतीवर प्रेम करणारा व्यक्ती;
ANGLOSPHERE (अँग्लोस्फीयर) - इंग्रजी बोलणाऱ्या देशांचा समूह.
एकूण 35 शब्द झाले. पाहता पाहता किती केले.
6) Gamo - शब्द 'gamo' ग्रीकमधून येतो. त्याचा अर्थ होतो‘लग्न’.
या रुटपासून आपल्याला हे शब्द मिळतात-
MONOGAMY (उच्चार - मोनोगामी) -एका वेळी फक्त एकच लग्न करण्याची प्रथा;
BIGAMY (बायगमी) - दोन विवाहाची प्रथा किंवा दोन विवाह करणे;
POLYGAMY (पॉलीगामी)- बहु-विवाह प्रथा किंवा स्थिती;
MISOGAMY (मिसोगमी) - लग्नाचा द्वेष;
MISOGAMIST (मिसोगेमिस्ट) – लग्नाच्या संकल्पनेचा द्वेष करणारा व्यक्ती.
झाले 40 शब्द.
व्हिडिो संपूर्ण पाहा, आर्टिकल शेअर करा.
तर आजचा करिअर फंडा हा आहे की, इंग्रजी शिकताना व्होकॅब्युलरी स्ट्राँग करणे महत्त्वाचे आहे. यासाठी रुट वर्ड्सचा अभ्यास सर्वात चांगली पद्धत आहे.
करुन दाखवू या !
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.