आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्बंध भारताने ३१ डिसेंबरपर्यंत वाढवले आहेत. काही निवडक उड्डाणांना या काळात परवानगी असेल. भारताने लॉकडाऊनदरम्यान २३ मार्चपासून ही बंदी लागू केली होती. ती ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीनंतरही एखाद्याला परदेशात जायचे असल्यास काय करता येऊ शकेल? इतर देशांतील उड्डाणांची स्थिती याबद्दल जाणून घेऊया.
कोणत्याही निवडक उड्डाणांना मंजुरी ?
बंदी असली तरी सरकारच्या मंजुरीने वंदे भारत मिशनच्या काही निवडक मार्गांवर परदेशी उड्डाण शक्य आहे. त्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मंजुरी दिली जात आहे. त्याद्वारे प्रवास करणे शक्य आहे.
कोणत्या प्रकारच्या उड्डाणांवर बंदी आहे ?
सर्व प्रकारच्या कमर्शियल उड्डाणांवरीवर बंदीत वाढ. म्हणजेच परदेशातून कोणत्याही एअरलाइन्सचा प्रवासी भारतात येणार नाही आणि येथील कोणत्या कंपनीच्या प्रवाशास परदेशात जाता येणार नाही.
कोणत्या देशांसोबत करार आहे ?
सध्या अमेरिका, ब्रिटन, यूएई, अफगाणिस्तान, फ्रान्स, जर्मनी, इराक, बहरीन, भूतान, कॅनडा, इथिओपिया, बांगलादेश, जपान, केनिया, मालदीव, कतार, नायजेरिया, आेमान, रवांडा, टांझानिया, नेदरलँड्स, युक्रेनसोबत हा करार झालाय.
एअर बबल करार काय आहे ?
हा करार झाल्यास संबंधित देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी परवानगी मिळते. ही द्विपक्षीय व्यवस्था आहे. नियम व प्रतिबंधाच्या आधारे दोन्ही देशांत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे संचालन करण्यासाठी ही व्यवस्था मदत करते.
परदेशात कसे जाता येऊ शकते?
ही बाब भारताच्या एअर बबल करारावर अवलंबून आहे. ज्या देशात जायचे आहे, त्या देशासोबत भारताचा एअर बबल करार आहे की नाही, हे पाहावे लागेल. भारताने कोरोनाकाळात २२ देशांसोबत एअर बबल करार केला होता. त्याअंतर्गत लाखो लोकांची ने-आण करण्यात आली होती.
जगभरात आंतरराष्ट्रीय उड्डाणांची स्थिती काय ?
सध्या पाकिस्तान, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेसह ७३ देेशांत बंदी नाही. अनेक देशांनी कोरोना तपासणी, निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा क्वाॅरंटाइन इत्यादी शर्ती लागू केल्या आहेत. ५० देशांत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर पूर्णपणे बंदी आहे. त्यात अफगाणिस्तान, इंडोनेशियाव्यतिरिक्त बहुतांश आफ्रिकी देश आहेत. कॅनडा, अमेरिका, रशियासह ९२ देशांत अंशत: बंदी आहे. नेपाळ व म्यानमारसह ४ देशांत लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. त्याचा फायदा प्रवास गरजेचा असलेल्यांना होऊ शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.