आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Leh Ladakh Ground Report; India China Border IAF News Third Reports Updates | Indian Air Force To Journalist Over Fighter Plane Video

ग्राउंड रिपोर्ट-3:फायटर प्लेनचे व्हिडिओ काढू नका- एअरफोर्सने लेहमध्ये आलेल्या पत्रकाराला अपील; लेहपासून गलवानला जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी

लेह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिस्ट्रिक्ट अॅडमिनिस्ट्रेशनचा नवीन नियम- दिल्लीवरुन लेहला येणाऱ्या माध्यम कर्मचाऱ्यांना आता 7 दिवस क्वारेंटाइन राहावे लागेल

उपमिता वाजपेयी

एका दिवसापूर्वी आकाशात उडणाऱ्या फायटर प्लेनचे अनेक फुटेज मीडिया चॅनल्सवर चालल्यानंतर शनिवारी एअरफोर्सने लेहमध्ये गेलेल्या सर्व पत्रकारांना व्हिडिओ न काढण्याची अपील केली आहे. याबाबत शनिवारी सकाळी पहिला फोन लेहचे लोकल जर्नलिस्ट आणि प्रेस क्लबचे प्रेसिडेंट मोरुप स्टंजिंग यांच्याकडे आला. फोन एअरफोर्स ऑफिसरचा होता. परंतू, मोरुप यांनी आम्हाला त्या अधिकाऱ्याचे नाव सांगितले नाही. मोरुप यांनी सांगितल्यानुसार, एअरफोर्स अधिकाऱ्यांचे म्हणने आहे की, जो कोणी पत्रकार एअपर मूव्हमेंटचे फोटो घेत आहे, त्यांना व्हिडिओ घेण्यास मनाई असल्याचे सांगा. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्यामुले एअरफोर्सने हा निर्णय घेतला आहे.

मोरुप यांनी स्थानिक पत्रकारांसोबत राष्ट्रीय माध्यम कर्मचाऱ्यांनाही ही माहिती दिली आहे. यादरम्यान, एअरफोर्स अधिकाऱ्यांनी हॉटेल अथॉरिटीजलाही सांगितले आहे की, त्यांच्याकडे थांबलेल्या नॅशनल मीडिया जर्नलिस्टला एअर मूव्हमेंटचे व्हिडिओ काढण्यास मनाई करा. पोलिसांनी लेहमधील हॉटेल्समध्ये थांबलेल्या सर्वांना याबाबत माहिती दिली आहे.

हा रास्ता गलवान, पैन्गॉन्ग आणि चीनच्या सीमेकडे जातो.

लेहवरुन गलवानला जाऊ दिले जात नाहीये

या दरम्यान ज्या हॉटेल्समध्ये दिल्लीचे माध्यम कर्मचारी थांबले आहेत, त्याबाहेर लेहवरुन गलवानला जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी एक टेंट लावला आहे. पोलिस कोणालाच लेहवरुन गलवानकडे जाऊ देत नाहीयेत. हाच रस्ता गलवान, पैन्गॉन्ग आणि चीनच्या सीमावर्ती भागाकडे जातो. याच रस्त्यावर पुढे सेनेचे इस्टॅब्लिशमेंटदेखील आहेत.

दिल्लीवरुन येणाऱ्या माध्यम कर्मचाऱ्यांसाठी डिस्ट्रिक्ट अॅडमिनिस्ट्रेशनने कोरोनाची नवीन गाइडलाइन काढली आहे. आता येणाऱ्या नवीन पत्रकारांना लेहमध्ये आल्यानंतर 7 दिवस क्वारेंटाइन राहावे लागेल.

लेहमधील मुख्य चौकात लोकांची गर्दी कमी झाली.

मुख्य चौक आणि रस्त्यावर लोकांचे गर्दी पाहायला मिळत नाहीये

यादरम्यान रविवारपासून लेहमध्ये फुल लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून कोणत्याच गाडीला येऊ दिले जात नाहीये. 

0